प्रचंड चंडाबाई सप्तश्रृंग निवासिनी हो ।
ओवाळू आरती आदिशत्त*ी अंबाबाई हो । प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
कडकत धडकत त्रिशूळ कोधे फिरविशी दिगमंडळी हो।
गडगड गर्जती मृदूंग तो मर फिरविशी तनूजा वरि हो ।
भडभड शोणित वाट तटतट मूंडे उडविशी नभी हो ।
खदखत हासती भूते घटघट करिती शोणित पान हो ।।1।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
अष्टदश भुजदंड माथा बरग्या पिगट जटा हो।
रत्त*ांबर परिधान शोभे कासोटा तटतटीत हो।
चंदन चर्चित अंगी भाळी मृगनाभीचा टिळा हो।
तकाकी शोणित राहे तेज फाकितसे अंबरी हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
सिहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो ।
पसरूनी वितंड दाढा वदनी केले अग्नीकुंड हो।
घोर गर्जना केली कंपित झाले हे ब्रम्हांड हो ।
थरथर कापती असुरे पळती अपूरे हे ब्रम्हांड हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
भृकूटी व्यंकट केल्या नेत्री अग्नीचे स्फूलींग हो।
थयथय टाकीसी ज्वाला करिसी असूराचा मुळभंग हो ।
खणखण वाजती खडगे, सणसण सोडिसी कैसे शर हो ।
घणघण घंटा नादे दूमदूले अवती अंग हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
ऐसी ही अदिशत्त*ी हिचा न कळे कोणा पार हो
स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकी जयजयकार हो ।
विनवी गिरजा नंदन अंबे चरणी नमस्कार हो
ऐसी ही जगदंबा भत्त*ा नेईल अक्षय पार हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
गायक – श्री.विनोद पंदीरकर.
Leave a Reply