प्रतिबिंब हे कुणाचे आरशात पाहतो मी हा चेहरा कुणाचा काही न जाणतो मी कोमेजल्या जिवाला द्या मायेचा ओलावा त्या राबत्या जिवाला द्या क्षणभरी विसावा उपदेश हा तुम्हाला केलाच वेळोवेळी परी वेळ तीच येता विपरीत वागलो मी हा चेहरा कुणाचा काही न जाणतो मी जगी भार तो दुजाचा थोडा तरी वहावा
हळुवार फुंकरीचा जखमेस लेप द्यावा हा चेहरा कुणाचा काही न जाणतो मी गुणगान हे दयेचे गाऊन सर्वकाळी स्थळी आक्रंदले कुणी त्या ना थांबलो कधी मी हा चेहरा कुणाचा काही न जाणतो मी बिंब की प्रतिबिंब खरे ही भ्रांत मज पडावी माझ्याच ओळखीची ना खूणही उरावी निज शोध थांबण्याची आशाच संपलेली वेडात वेदनेच्या आरसाच फोडिला मी हा चेहरा कुणाचा काही न जाणतो मी
— श्री.उदय विनायक भिडे
Leave a Reply