नवीन लेखन...

प्रतिभावान बासरी वादक पन्नालाल घोष

अमोल ज्योती घोष ऊर्फ पन्नालाल घोष, हे बासरी या आपल्या राष्ट्रीय वाद्याचे जनक. त्यांचा जन्म २४ जुलै १९११ रोजी झाला.भारतभर पन्नाबाबुजींचे शिष्य विखुरलेले तर आहेतच, पण रसिक तर अगणित आहेत. ज्यांनी मा.पन्नालाल घोष यांची बासरी ऐकली, प्रत्यक्ष वा ध्वनिमुद्रिकेवर, ते त्यांचे भक्त झाले. त्यांच्या बाबतीतला एक नियमच अथवा व्रतच म्हणाना : तो असा- ‘मी फक्त पन्नालाल घोषांचीच बासरी ऐकतो’. जसे ‘गर्व से कहो हम शाकाहारी है। खरोखरच काय आहे हो यात वेगळे? तर उत्तर येते, आधी त्यांची बासरी ऐका.

गायनातील, वादनातील सर्व प्रकार ठुमरी टप्पा, खयाल तंतकारी, गमक मिंडकाम, सिनेसंगीत त्यांनी प्रभावीपणे सादर करणे ही त्यांची खासियतच होती. यासाठी लागणारी प्रचंड मेहनत, संशोधन करण्याची वृत्ती, जिद्द आणि वेणुप्रेम यांच्या बळावर त्यांनी बासरीला संगीत जगतात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांनी बासरीची लांबी अडीच फुटापर्यंत वाढविली. तीव्र खर्ज मध्यमाचे छिद्र शोधले. खर्जाची बासरी त्यांनी संशोधित केली. सहा तारांचा तंबोरा, तसेच वरच्या पट्टीची तंबोरी केली. सूरपेटी बासरीच्या साथीला घेऊ लागले. १९ वे वय पूर्ण व्हावयाच्या आत हे सर्व केले. आयुष्यभर स्वत:ला त्यांनी शिष्यच म्हणवून घेतले. अनेक गुरू केले. त्यापैकी श्रीरामचंद्र बोराल, काझी नसरुद्दिन इस्लाम यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. श्री. गिरिजाशंकर चक्रवर्ती यांच्याकडून धृपद गायन, तसेच उ. अल्लाउद्दीन बाबा यांचे गंडाबंधित शिष्य झाले. मैहर घराण्याची गायकी, तसेच तंतकारी अंगाचे बासरीवादन शिकून घेतले.

बासरीमध्ये दमदार फुंक यावी यासाठी जिऊजित्सू, मुष्टियुद्ध शिकून बंगाल राज्यस्तरापर्यंत प्रावीण्य पदके मिळविली. स्वत: उत्तम रचनाकार असल्याने त्यांनी अनेक संगीत रचना केल्या. त्यापैकी कलिंग विजय, आंदोलिका विशेष गाजल्या. नवीन राग तयार केले. दीपावली, जयंत, पुष्पचंद्रिका, चंद्रमौळी, नूपुरध्वनी हे राग ऐकल्यावर या वेणुवादकाचे अंतरंग किती तरल आहे याची साक्ष पटते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या संतोक्तीची प्रचीती येते. आपली वेणुवादनाची परंपरा चालू राहावी म्हणून मुक्तहस्ताने गुरू-शिष्य परंपरेने अनेक दर्जेदार शिष्य त्यांनी तयार केले. त्यापैकी देवेंद्र मुर्डेश्वर, पं. व्ही. जी.कर्नाड, पं. रघुनाथ सेठ, पं. हरिपद चौधरी ही परंपरा, हा स्वरगंगेचा ओघ वाढतच आहे. पं. देवेंद्र मुर्डेश्वरांपुढील पिढीही अशीच घडविली. त्यात विशेष उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे पं.केशव गिंडे यांचा. त्यांचे जीवन केवळ बासरीसाठीच आहे. त्यांचे सर्वात मोठे संशोधन म्हणजे त्यांनी तयार केलेली ‘केशव वेणू’. एकाच बासरीवर साडेतीन सप्तके सहज वाजविता येतात, अशी ही बासरी.

अणुमंद्र मुरली, तसेच आपला शिष्य अजरुद्दीन याच्या सहयोगातून ८ फूट लांबीची विश्वातील सर्वात मोठी अनाहतवेणू संशोधित केली. मालकंससारखा अवघड राग या वेणूवर वाजविता येऊ शकतो हे रसिकांना त्यांनी दाखवून दिले. मा.पन्नालाल घोष यांचे २० एप्रिल १९६० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

पन्नालाल घोष यांचे बासरी वादन.

https://www.youtube.com/watch?v=K9ruffturYY

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on प्रतिभावान बासरी वादक पन्नालाल घोष

  1. Pannababu’s recordings in Raaga जयंत, पुष्पचंद्रिका and नूपुरध्वनी are not available. It is only known that he created these Raaga. He however extensively played दीपावली, and, total about 35 minutes of दीपावली are available. Only two 3½ min. recordings of चंद्रमौळी are available.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..