नवीन लेखन...

प्रतिमाच प्रतिमा !

बच्चा भी खेले, बच्चेका बाप भी खेले अशी तोंडी जाहिरात करत खेळणी विकणारे अनेक जण चौपाटीवर, उपनगरी गाड्यांमध्ये, इतरत्र आपल्याला भेटत असतात. त्यातली किती खेळणी तशा प्रकारची असतात, हे सांगणं कठिण आहे. पण कॅलिडोस्कोप हे मात्र अशा प्रकारचं खेळणं आहे यात शंका नाही. त्याच्या आत डोकावून त्यातल्या रंगीबेरंगी रचनाबंध अनिमिष नेत्रांनी बघत राहणं आणि हाताला जरासा झटका देत त्या बदलून टाकणं यासारखा आनंद नाही.

वास्तविक असतं काय त्या डबड्यामध्ये? तुटलेल्या बांगड्यांचे किंवा तसलेच कसले तरी रंगीत काचेचे वेडेवाकडे तुकडे. आणि तीन अरुंद पण लांब आरसे. हे आरसे एकमेकांना समभुज त्रिकोणात जोडलेले असतात. निरनिराळे आकृतीबंध उभे राहतात ते या आरशांच्या रचनेपोटीच. कारण त्या तिन्ही आरशांच्या समोर असलेल्या त्या काचेच्या तुकड्यांच्या प्रतिमा त्या आरशांमध्ये उमटतात. आणि त्या प्रत्येक प्रतिमेच्या प्रतिमाही बाकीच्या दोन आरशांमध्ये उमटतात. अशा किती तरी प्रतिमा त्या तेवढ्याशा जागेत उभ्या राहतात आणि त्यातूनच ते मनोहारी रचनाबंध उभे राहतात. जेव्हा दोन आरसे असे एकमेकाशी काही कोन करून उभे राहतात तेव्हा त्यांच्या समोर ठेवलेल्या वस्तूच्या प्रतिमा दोन्ही आरशात तर उमटतातच. पण प्रत्येक प्रतिमा ही दुसर्‍या आरशाच्या नजरेतून वस्तू’च असते.

त्यामुळे तिचीही प्रतिमा त्या दुसर्‍या आरशात उमटते. तिची प्रतिमा परत पहिल्या आरशात. तिची परत दुसर्‍या. आणि हा सिलसिला त्या प्रतिमा त्या आरशांच्या नजरेआड होईपर्यंत चालूच राहतो. त्यामुळं मग अनेक प्रतिमा उभ्या राहतात. त्यांची नेमकी संख्या ही त्या दोन आरशांमध्ये किती अंशाचा कोन आहे यावर अवलंबून असते. एकमेकासमोर म्हणजेच एकमेकांना समांतर असलेल्या आरशांमधल्या अशा प्रतिमांची संख्या अगणित अशीच असते. विश्वास बसत नसेल तर पुढच्या वेळी केस कापून घ्यायला सलूनमध्ये जाल तेव्हा तिथल्या आरशात डोकावा.

लेखक : डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..