भूजलप्रदूषण, मातीप्रदूषण, औष्णिक प्रदूषण, आण्विक प्रदूषण या प्रत्येकासाठी स्वतंत्र अशा प्रकरणांत सविस्तर, सखोल, उद्बोधक व उपयुक्त माहिती दिली आहे. सध्या सर्व जगाला भेडसावणाऱ्या जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर आणि आम्लपर्जन्यावर पुस्तकात लिहितांना लेखकांनी या विषयांना योग्य तो न्याय दिला आहे. पृ.160 किं. 160 रू. ISBN : 978-93-80232-25-6वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे शहरीकरण, औद्योगीकरण, जंगलांची होणारी बेछूट कत्तल यामुळे पर्यावरणाचा समतोल मानवानेच विज्ञान तंत्रज्ञानाच्या बळावर बिघडवून टाकला आहे. प्रदूषणाच्या भस्मासूराला माणसानेच जन्माला घातले आहे. स्वत:च्या कल्याणासाठी, स्वार्थापोटी व निसर्गावर स्वामीत्व गाजविणार्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे जल, वायू, ध्वनी, मृदा प्रदूषणांचा अजगर निर्माण केला असून हा अजगर मानवालाच नव्हे तर आपल्या सुंदर वसुंधरेलाच घट्ट विळखा घालीत आहे आणि एक दिवस हा प्रदूषणाचा भस्मासूर सजीवांचं अस्तित्वच संपवून टाकेल, अशी भीती वाटत आहे.हे प्रदूषण थांबविता येणार नाही का? हे सारं शक्य आहे. पण त्यासाठी हवी दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर कायद्यांची अंमलबजावणी आणि जनमानसात पर्यावरणाबद्दलची आस्था. त्यासाठीच हा लेखन प्रपंच केला आहे.
प्रदूषणातून पर्यावरणाकडे : प्रा. डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पाने : १६०
किंमत :१६०/- रू.
नचिकेत प्रकाशन
24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply