आपली प्रशंसा केलेली कोणाला आवडत नाही? उलट सर्वांनी सदासर्वकाळ आपली प्रशंसाच करावी असेच अनेकांना वाटत असते. परंतु अशा प्रशंसेमुळे गर्व निर्माण झाल्यास कधी कधी आपल्या कार्यात तो व्यत्यय आणू शकतो. म्हणून प्रशंसेला सहसा भुलून जाऊ नये. यासंदर्भात आचार्य विनोबा भावे यांचे एक उदाहरण खूपच बोलके आहे. महात्मा गांधी यांची विचारसरणी प्रमाण मानून आचार्य विनोबा भावे यांनी पवनारला आपला आश्रम सुरू केला. त्या वेळी तेथे जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज हे काही काळ शिकण्यासाठी म्हणून आले होते. एकदा विनोबाजी चरख्यावर सूत कातत बसले असता तेथे त्यांना कोणीतरी पोस्टाने आलेली काही पत्रे आणून दिली. त्यातील एक पत्र महात्मा गांधी यांचे होते. विनोबाजींनी ते पत्र वाचले व लगेच ते फाडून फेकून दिले. या वेळी कमलनयन बजाज तेथेच होते. त्यांना विनोबाजींच्या कृत्याचे आश्चर्य वाटले. विनोबाजींच्या माघारी त्यांनी त्या पत्राचे फाडलेले तुकडे गोळा केले व एकत्र करून वाचले. त्या पत्रात महात्माजींनी विनोबांना लिहिले होते, ‘तुमच्याइतकी महान व्यक्ती अजून तरी माझ्या पाहण्यात नाही’. खरे तर महात्माजींचे हे प्रशंसापत्र विनोबाजींनी ज्याला त्याला दाखवायला पाहिजे होते. परंतु ते त्यांनी फाडून टाकले होते. म्हणून कमलनयन बजाज यांनी विनोबाजींना त्यासंबंधी विचारणा केली असता ते म्हणाले की, अशी पत्रे जपून ठेवणे हा मोह आहे. कारण त्यामुळे मला गर्व उत्पन्न होईल व गर्वाने फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. त्यामुळे ते पत्र जवळ बाळगणे म्हणजे माझे एका परीने नुकसानच होते. अर्थात, त्या महात्मा गांधीजींनी मजविषयीच्या ज्या प्रेमाने ते पत्र लिहिले होते तो प्रेमाचा भाग मी आधीच काढून घेतलेला आहे. बाकींचे नष्ट करण्यातच माझा फायदा होता व म्हणून ते पत्र मी फाडून टाकले. विनोबाजींचे हे तर्कशुद्ध विवेचन ऐकून कमलनयन बजाज यांचे अर्थातच समाधान झाले.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply