नवीन लेखन...

प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॅबरे डान्सर पद्मा खन्ना

पद्मा खन्ना या ट्रेंड ड्रान्सर असून वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पंडीत बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवले. त्यांचा जन्म १० मार्च १९४९ रोजी बनारस येथे झाला.अभिनेत्री पद्मिनी आणि वैजयंती माला यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्या पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. १९६१ मध्ये ‘भैय्या’ या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली. १९७० मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. ‘जॉनी मेरा नाम’ या सिनेमात त्यांनी कॅबरे डान्सरची भूमिका वठवली. त्यानंतर ‘लोफर’, ‘जान-ए-बहार’, ‘पाकिजा’, ‘सौदागर’, ‘हेरा फेरी’, ‘यार मेरी जिंदगी’, ‘प्यार दिवाना’, ‘जोशिला’, ‘अनोखी अदा’, ‘रामपूर का लक्ष्मण’ या सिनेमांमध्ये काम केले. पद्मा यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये कॅबरे डान्स केला. हिंदी सोबतच जवळजवळ १४ भोजपुरी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.याशिवाय १९७७ मध्ये ‘घेर घेर माती ना चुली’ या गुजराती आणि १९७८ मध्ये’ आलेल्या जिन्द्रा यार दी’ आणि’ शेर पुत्तर’ या पंजाबी सिनेमातही त्यांनी काम केले. १९८३ मध्ये आलेल्या ‘देवता’ या सिनेमातील ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’ आणि १९८६ मध्ये ‘माफिचा साक्षीदार’या सिनेमातील ‘शमा ने जब आग. ‘या गाण्यांमध्ये त्यांचा गेस्ट अपिअरन्स होता. १९८० च्या दशकात छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या ‘रामायण’ या मालिकेत पद्मा खन्ना यांनी राणी कैकयीची भूमिका साकारली.या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. २००४ मध्ये त्यांनी ‘नाहीर हुताल जया’ या भोजपूरी सिनेमाचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक जगदीश सिडना यांच्यासोबत पद्मा खन्ना विवाहबद्ध झाल्या.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर मा.पद्मा खन्ना या युएसए मधील न्यू जर्सी येथे स्थायिक झाल्या आहेत. तेथे त्या डान्स अकॅडमी चालवतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

https://www.youtube.com/shared?ci=oHntWZBPB1Y

https://www.youtube.com/shared?ci=y40aBf3QxLA

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..