हृद्यस्पर्शी चित्रपट पाहताना जर
प्रियकराच्या डोळ्यात अश्रू आले
तर प्रेयसीने समजून जावं तो हळ्वा आहे,
त्याच्या हृद्यात कोठेतरी ओलावा आहे,
तो तिच्यापूर्वी ही कोणाच्यातरी प्रेमात पडलेला आहे
आणि पडलेला नसेल तर भविष्यात पडणार आहे…
अशा प्रियकराला जपणे फार अवघड असते.
त्यांच्या हृद्यातील वेदना कधीच ओठावर येत नाहीत
तर त्या नेहमीच डोळ्यातील अश्रूंच्या रूपात बाहेर पडत असतात
त्यामुळे त्यावेळी त्याच्या
डोळ्यातून येणारे अश्रू
जी आपल्या नाजूक बोटावर टिपते
तो तिच्याच प्रेमात पडत असतो नव्याने…
त्याचं हे असं प्रेमात पडणं तोपर्यत सुरू राहतं
अथवा त्याच्या हृद्यातील संवेद्ना नष्ट होत नाहीत
अशा प्रियकराला प्रेमात पाडण फार सोप्प असत
पण त्याला प्रेमात पाडून ठेवण तितकच अवघड असतं …
कारण त्यांच्या अश्रूंसोबत प्रत्येक वेळी
त्यांच्या हृद्यातील प्रेमही वाहून जात असतं
त्यामुळे त्याला त्याच्यावर रोजच न चुकता
प्रेम करणार कोणी तरी हवं असतं.
रोज नव्याने त्याच्या प्रेमात पडणारी
प्रेयसीच त्याच्याकडे प्रेयसी म्ह्णून टिकत असते…
असा प्रियकर समाजात प्रियकर म्ह्णून
सतत बदनाम होत असतो
तरी रोज कोणी ना कोणी नव्याने
प्रेयसी म्ह्णून त्याच्या प्रेमात पडतच असते…
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply