प्रेमाच्या नावाखाली
आज मांडला जातोय
बाजार अनैतिकतेचा …
प्रेमात पडलो की
आपण काहीही करायला
मोकळे होतो असा
गैरसमजच झालाय
हल्ली कित्येकांचा…
प्रेमाच्या नावाखाली
आज कितीतरी मुल
अनाथ होत आहेत विनाकारण
अनैतिक संबंधामुळे
आईच्या किव्हा बापाच्या…
प्रेमात पडलेल्यांनी हल्ली
जात – धर्म, नाते – संबंधच
नव्हे तर समाज, संस्कृती
आणि नैतिकता ही लपवून ठेवलेय खाली आपल्या बुडाच्या…
प्रेम आंधळ असत
हल्ली ते मूक आणि बहिरही झालाय
किंचित दुरही गेलय
संपर्कातून बुद्धीच्या…
प्रेमाच्या नावाखाली
पूर्वी मुलगी पळून जायची
हल्ली आई, सून, बायको
किंव्हा वहिनीही पळून जाते
तेव्हा चिंधड्या उधालेल्या असतात
कित्येकांच्या हृद्याच्या…
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply