प्रेमः एक आठवणींची कविता क्रमशः …..
वाचु जाता ओळी,
जणू भासते रांगोळी.
पाना पानावर भास,
साडी अंगोअंग निळी.
किती आठवणींची गती,
किती येती किती जाती.
जशा पर्या भोवताली,
फेर धरुन नाचती.
किती हिरवी गं राने,
तुडवीली बेफानपणे.
तुझा घटट हात हाती,
किती ओली गं चुंबणे.
कधी पावसाच्या धारा,
कधी तुषारांचा मारा.
उघड्या अंगाने साहीला,
उधानता गार वारा.
कधी छपराच्या खाली,
पागोळी पागोळी झेलली.
जरा स्पर्शता मी तुला,
लाली येई तुझ्या गाली.
तुझे चोरटे कटाक्ष,
माझ्या काळजाचे भक्ष.
माझ्या नजरेत मावेना,
तुझे भिजलेले वक्ष.
असा घाट माळशेज ,
त्याचा हिरवा गं साज.
किती कोसळे प्रपात,
तरी ये ह्यदयाची गाज.
अशा प्रपातांच्या खाली,
रुपसुंदरी त्या न्हाली.
शहारुन गेले पाणी,
दैना मनाची गं झाली.
किती रात्री चांदण्याच्या,
तुझ्या माझ्या एकांताच्या.
किती गारठलो तरी,
रात्री गेल्या त्या ऊबेच्या. ( क्रमशः )
कवी – वसंत बंदावणे ९३७२१२६४४४
— वसंत रेवजी बंदावणे उर्फ बी.बंडू
Leave a Reply