आयुष्यभर त्याने प्रेमाचा शोध घेतला,तरीही तो कोरडाच राहीला.वर्तुळाचे दुसरे टोक सापडले आहे का कधी कुणाला?मोह-माया व वासनेच्या भोवऱ्यातच दडलेला आहे,प्रेमाचा अथांग महासागर.गरज आहे फक्त अहंकाराने ग्रासलेल्या हृदयांतील बंद कपाटे उघडण्याची. प्रेमाच्या उजेडात दिसेल जल-थल-नभ व संपूर्ण चराचर सृष्टीत व्याप्त आहे फक्त एकच प्रेम दृव्य.
— विवेक पटाईत
Leave a Reply