‘जागते रहो‘ या सिनेमात शेवटी येणारं जागो मोहन प्यारे, नवयुग चूमे नैन तुम्हारे. हे भैरवातलं बंदिशगीत आपल्याला रात्रीतून पहाटेकडे नेतं. खेड्यातून शहरात आलेला एक तरुण.राज कपूर. तहानलेला.पाण्यासाठी दारोदार वणवण हिंडत असता एका रात्रीत शहराचं भयाण वास्तव अनुभवणारा.
प्राचीन रागरागिण्यांच्या वर्गीकरणातल्या मुख्य सहा रागांमध्ये भैरव हा आहे. भैरवकुळात अनेक रागरागिण्या गुण्यागोविंदाने राहतात. कालिंगडा, रामकली हे त्याचे आप्त आहेत, तर नट भैरव, भैरव- बहार असे जोडराग त्याचे मित्र आहेत.
झुंजुमुंजू व्हायला येतं, पण पाणीही मिळालं नाही म्हणून त्रासलेला असा तो… शेवटी सामान्य स्थितीतली घागरीनं पाणी भरणारी स्त्री- ‘नर्गिस- घागरीनं पाणी त्याच्या ओंजळीत घालतेय.भैरवाच्या सुरांनी झालेली पहाट! सिनेमा संपतो,पण तो भैरव कायम मनात रेंगाळत राहतो.
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो,
शोमॅन आर के चा ‘जागते रहो’ हा खरे तर एक व्यंगात्मक चित्रपट.जवळपास या चित्रपटात राजकपूरच्या तोंडी संवादच नाही.एक घोटभर पाण्यासाठी दारोदारी फिरत त्याला आलेले अनुभव आपल्यासमोर मांडणारा.
हा चित्रपट पाहतांना तुम्हांला तुमची सध्याची स्थिती यात जाणवेल. पाणी म्हणजे जवळपास तुम्हांला हवी असलेली मनासारखी पोस्ट. तेव्हा संयम ठेवा. आपल्याला येत असलेल्या बऱ्या वाईट अनुभवाने जगणे शिका. एक दिवशी तुम्हांलाही नर्गिस मिळेल. जी तुमच्यासाठी पाणी (पोस्ट) घेउन तुमची वाट पाहत असेल.
Leave a Reply