दोन मित्रांमधील संवाद …
पहिला मित्र : लग्न का करीत नाहीस ?
दुसरा मित्र : लग्न का करू ?
पहिला मित्र : आयुष्यात कोणाची तरी साथ हवी ना ?
दुसरा मित्र : तू तुझ्या बायकोसोबत रोज किती तास असतोस ?
पहिला मित्र : रात्रीचे आठ तास ?
दुसरा मित्र : खऱ्या अर्थाने सांग ?
पहिला मित्र : पंधरा मिनिटे !
दुसरा मित्र : आठवड्याला ?
पहिला मित्र : एक तास !
दुसरा मित्र : महिन्यात ?
पहिला मित्र : महिन्यात चार तास !
दुसरा मित्र : वर्षात :
पहिला मित्र : ४८ तास ( दोन दिवस )
दुसरा मित्र : ५० वर्षे एकत्र राहिलात तर सोबत किती वर्षे असाल ?
पहिला मित्र : फक्त १०० दिवस !
दुसरा मित्र : तिच्या सोबत १०० दिवस घालविण्यासाठी आयुष्याची किती वर्षे मोजलीस ?
पहिला मित्र : ५० वर्षे !
दुसरा मित्र : जिचे १०० दिवस मिळविण्यासाठी तू आयुष्याचे ५० वर्षे मोजणार आहेस ती तुला शेवटपर्यत साथ देईलच याची तुला खात्री आहे ?
पहिला मित्र : नाही पण …
दुसरा मित्र : मला त्या १०० दिवसांपेक्षा माझी ५० वर्षे अधिक मौल्यवान आहेत मला ती सारी सार्थकी लावायची आहेत , विचार कर मी ५० वर्षात जे कार्य करेन त्यामुळे मी मेल्यावरही पुढची पन्नास वर्षे माझी आठवण काढली जाईल आणि तुझी ?
दुसरा मित्र : फक्त १२ दिवस !
— निलेश बामणे ( बी डी एन )
Leave a Reply