नवीन लेखन...

बलात्कार विकृती कि मानसिकता

” बलात्कार तर देशात सगळीकडेच होतात, मग दिल्ली बलात्काराचा एवढा गहजब का? ” हे वाक्य देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच. खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही? आपण रोज टीव्ही वर बातम्या बघतो, सकाळी वर्तमानपत्र वाचतो, नीट लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, कि हि नित्याचीच बाब झाली आहे. रोज वर्तमानपत्रात २/३ तरी बलात्काराच्या बातम्या असतातच. पण मला माननीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांना एक विनंती करायची आहे. कि” साहेब आपण देशाचे गृहमंत्री आहात, संसदेत या प्रकारचे वाक्य बोलताना आपल्याला काहीच वाटलं नाही का?. संपूर्ण देशाची पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात आहे. देशात आपल सरकार आहे. आपल्या पक्षाच्या प्रमुख एक महिला आहेत, आणि सगळ्यात महत्वाचा आपण हि एका मुलीचे बाप आहात. मग बलात्कार संबंधीचे वक्तव्य आपण इतक्या निर्विकार पणे कसे काय करू शकता. अशा घटनांकडे एक राजकीय नेता म्हणून नाही तर एका मुलीचा बाप म्हणून आपण कधीच बघत नाही काय? कोणताही माणूस म्हणवून घेणार्‍या प्राण्याला अशा घटनांची चीड येते किंबहुना यायलाच हवी आणि जर येत नसेल तर त्याला माणूस म्हणण्यात काही अर्थ नाही मग आत्ता तुम्हीच ठरावा तुम्हाला काय म्हणायचं. ज्या देशाच्या राजधानी मध्ये महिला सुरक्षित नाहीत, त्या देशाचे भवितव्य किती अंधकारमय असेल याचा विचार करा.”

संवेदनाहीन झालो आहोत का आपण? चीड येते कि नाही आपल्याला? रोज देशात अनेक बलात्कार होतात हि लज्जास्पद गोष्ट आहे हे कळतंय न आपल्याला?. या देशातच आपल्या आयाबहिणी राहतात. तरी आपण इतके सुस्त कसे? बलात्काराची बातमी आपण इतक्या निवांतपणे चहा पिता पिता वाचतो, पेपरचं पान बदलतो आणि मोकळे होतो. पण मग हे असेच चालू राहणार का? जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आपल्या देशाची, जगातला सगळ्यात तरुण देश आहे आपला, पण आपल्या देशात तरुण मुली, किंवा महिलाच काय छोट्या छोट्या चिमुरड्या हि सुरक्षित नाहीत. काय भवितव्य असू शकतं पुढच्या पिढीचं? सामान्य माणूस म्हणून आपण हा विचार करतो का?

खरं तर आता स्वताःला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली आहे, आपल्या पेक्षा प्राणी जास्त सुसंस्कारित असतात. विकृती विकृती म्हणजे किती विकृती आणि कसली हि विकृती. बर एका वेळेस एक माणूस विकृत होतही असेल पण एकाच वेळेस अनेक लोक विकृत होऊन सामुहिक बलात्काराच्या घटना घडतात त्या नराधमांच्या मध्ये एक हि माणूस नसतो का? त्यांच्या हि घरात आई, बहिण, बायको, मुलगी किंवा कोणीही महिला नसते का? जन्म देणारी आई तर असेलच ना मग हे कृत्य करताना ती आई नाही येत का समोर? काय मानसिकता होत चालली आहे अशा लोकांची बरं दिल्ली मध्ये हि घटना घडली त्याचे पडसाद देश भर उमटत असतानाही तशाच प्रकारच्या अनेक घटना देशात इतर ठिकाणी हि होत आहेत. नागपूर, मध्यप्रदेश, राजस्थान, आसाम या ठिकाणी नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटना या मला वाटतं जनतेला आवाहन आहे. कि तुम्ही कितीही निदर्शने करा आम्हाला त्याचे भय नाही. किंवा अशी विरोधी निदर्शने होत असताना हि विकृत लोक बलात्काराचे प्रकार मुद्दाम करतात का? आपल्या देशात कोणाला कायद्याचा धाक राहिला नाही आहे. खून, दरोडे, चोर्‍या, हाणामार्‍यासारखे गुन्हे तर नित्याचेच झालेत पण बलात्कारासारखे पाशवी गुन्हे करणार्‍यांना आता खरोखरच कायद्याचा बडगा दाखवायची वेळ आली आहे.

बालात्कारासारखी पाशवी कृत्ये करणारी व्यक्ती कधीच माणूस असू शकत नाही. त्यातल्या त्यात लहान मुली किंवा मुलं यांच्या बरोबर असे गलिच्छ प्रकार करणारा नराधम हा पशु म्हणण्यास हि लायक नाही अश्यांना पशु म्हणणे म्हणजे हा त्या बिचार्‍या पशूंचा अपमान असेल. हे केवळ सैतानच असू शकतात. आणि यांना वेळीच ठेचायला हवं नाहीतर ह्या सैतानांची वाढत चाललेली संख्या कधीही कोणावरही घातक हल्ला करू शकेल. आपल्या देशाचा कायदा आणि कायद्यातील पळवाटा अशा सैतानांना पूरक ठरत आहेत. त्यामुळे असे प्रकार करून हि निर्लज्ज लोक निर्धास्त पणे समाजात वावरतात. पण जर कायद्याची जबर त्यांना बसत नसेल तर आता आपणच काही तरी करायला हवं. अशी सैतानी कृत्ये करणारा गुन्हेगारच असणार हे जगजाहीर असताना मग कशाला हवं न्यायालय, पोलीस रिमांड आणि बचावाचा हक़्क़ यांना भरचौकात ठेचून मारले तर हि जमात आपोआप कमी होईल. आणि आपल्या देशात महिलांना सुरक्षित पणे वावरता येईल. हि विकृती जर संपवायची असेल तर आता कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सरकार वर विसंबून राहणं सोडायला हवं. समाजात वाढीस लागलेली हि घाण साफ करायला समाजानेच पुढाकार घ्यायला हवा. आणि मला वाटतं आता ती वेळ आली आहे, मी तयार आहे तुमचा काय?…..

जाता जाता अजून एक, लहानपणी शाळेत एक सुविचार शिकवला होता ” मुले म्हणजे देवाघरची फुले” फार छान वाटायचा वाचायला. जस जस मोठा होत गेलो नवीन गोष्ट शिकलो ” या जगात सगळ्यांचा करता करविता तो परमेश्वर आहे त्याच्या इच्छे शिवाय काहीच होत नाही” भगवतगीते मध्येही स्वत: परमेश्वराने तस सांगितलय. मग आता एक शेवटचा प्रश्न देवासाठी ” देवा तुझ्या अंगणातल्या ह्या गोंडस गोंडस कळ्या, सुंदर सुंदर फुल कोणीही सैतान असा ओरबाडून, कुस्करून टाकतो आणि तू नुसता पाहतोस आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे हे सगळ तुझ्या इच्छेने होत असेल तर खरा गुन्हेगार कोण?….

आपला,
शैलेश देशपांडे
पुणे.

— शैलेश िवलास देशपांडे उर्फ श…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..