नवीन लेखन...

बहिर्वक्र आरसे

अंतर्वक्र आरशाच्या उलट बहिर्वक्र आरसे असतात. म्हणजे यांचा गोलाकार भाग बाहेरच्या दिशेनं वळलेला असतो. याही आरशांचा केंद्रबिंदू आणि फोकस असतात. मात्र ते आरशाच्या पुढं नसून पाठीमागच्या भागात असतात. म्हणून गणिती भाषेत या आरशांचा फोकस उणे असतो असं म्हटल जातं.
अंतर्वक्र आरशांच्या बाबतीतले परावर्तनाचे नियम याही आरशांना लागू पडतात.

पण यांचा केंद्रबिंदू तसंच फोकस पाठीमागच्या बाजूला असल्यानं परावर्तित होणारे किरण विखुरल्यासारखे वाटतात. मूळ दिशेपासून फटकून दूरवर जात असल्यासारखे दिसतात. पण ते एकत्र येतात ते आरशाच्या पाठीमागे असलेल्या फोकसवर त्यामुळं या आरशांमधली प्रतिमाही सपाट आरशांच्या प्रतिमेसारखी आभासी स्वरुपाची असते. तिची उलटापालट झालेली नसते आणि ती आकारानंही लहान असते.

मोटारगाडीवर दोन्ही बाजूला मोटारीच्या पाठचा रस्ता दाखवणारे जे आरसे असतात ते असे बहिर्वक्र प्रकारचेच असतात. आपल्या मोटारीच्या पाठीमागून येणार्‍या गाड्यांची या आरशांमध्ये दिसणारी प्रतिमा लहान आकाराची असते. त्यामुळं ती पाठची गाडी आहे त्या पेक्षा दूरवर असल्याचा भास होतो. त्यापायी चालकाची फसगत होऊ नयेत यासाठी मोटारीच्या आरशांवर तसा स्पष्ट उल्लेखही असतो. पण सपाट आरशांपेक्षा व्यापक क्षेत्रातल्या वस्तूंच्या प्रतिमा याआरशात उमटू शकतात. त्यामुळं जिथं एखादा रस्ता काटकोनात वळतो तिथं कोपर्‍यावर पलीकडच्या बाजूला असलेल्या वस्तू पाहण्यासाठी या आरशांचा वापर केला जातो. दिल्लीला सेन्ट्रल सेक्रेटरीएटमधील रस्त्यांवर असे आरसे बसवलेले आहेत. त्यामुळं तिथून जाणार्‍या वाहनांना पलीकडच्या काटकोनातल्या रस्त्यावरून येणार्‍या गाड्या स्पष्ट दिसतात. त्यायोगे टक्कर होणं टाळलं जातं. सुरक्षेसाठी जिथं व्हिडिओ कॅमेरे बसवलेले असतात अशा ठिकाणीही बहिर्वक्र आरशांमुळं विस्तृत क्षेत्रावर एकाच कॅमेर्‍याद्वारे नजर ठेवता येते.

— बाळ फोंडके

1 Comment on बहिर्वक्र आरसे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..