नवीन लेखन...

बाप्पा…

तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो
दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो.

आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता?
नैवेद्य दाखवल्यावर –
आजकाल २१ मोदकाने काय होतेय सायेब?
असं म्हणाला असता?

नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला,
तुम्ही नवसाच्या लाईन मध्ये नव्हता ना मैडम,
असं म्हणाला असता?

अंधेरी वरून आलेल्या भक्ताला, लालबाग चा बाप्पा
हे अंधेरीचं मैटर आहे अंधेरी च्या बाप्पाला कॉन्टॅक्ट करा,
असं म्हणाला असता?

नाही…

त्याचा आशीर्वाद सगळ्यांवर सारखाच बरसतो..
Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

त्याच्या नावाखाली आम्ही धंदा थाटलाय,
एक असला तरी त्याला मंडळामध्ये वाटलाय,

गणपतीच्या सणाला परवा एक जण म्हणाला,
या वर्षी देवा तेवढं एक काम करून दे,
त्या फेमस गणपती चा तेवढं दर्शन करून दे,

भक्तांच्या या डिमांड ला तो गालातच हसतो,
Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

आशिर्वादाचं त्याने पॅकेज दिलं असतं?
माझ्याबरोबर शंकराचे आशीर्वाद, फक्त २० हजार..

ग्रुप नवस केला असता तर डिस्काऊंट दिला असता?
विसर्जनाच्या २ दिवस आधी, लास्ट २ डेज, लास्ट २ डेज..
असं ओरडला असता?

नाही… नाही… नाही…

भक्तीच्या धंद्यात त्याला इंटरेस्ट नसतो..
Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

त्याची उंची फुटात मोजणारे आपण,
भक्ती सोडून शक्ती दाखवणारे आपण,

जो आपल्याला वाचवत आलाय त्याला आपल्यापासून वाचवा,
नाक्या नाक्यावर बसवता तसा एक क्षण हृदयात बसवा..

एक क्षण कशाला हो..??
दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

विसर्जनाच्या दुसर्या दिवशी काय नजारा असतो?
दीड कोटी डोकी ज्या पायावर टेकली, तो पाय कुठेतरी असतो
तेवढेच आशीर्वाद देणारा, हात कुठेतरी असतो..
एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा,
स्वतः मात्र चौपाटीवर विखुरलेला असतो..

तरीही तो हसतो.. तो फसतो…
पुढच्या वर्षी आनंदाने आपल्या घरी बसतो..

त्याचा आशीर्वाद पुन्हा आपल्यावर बरसतो
Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

तुमच्या आनंदातच त्याला इंटरेस्ट असतो
दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

गणपती बाप्पा मोरया..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..