पौगंडावस्थेत नवीन गोष्टींविषयी वाटणारं कुतुहल, त्याचप्रमाणे शारिरीक-मानसिक बदलांमुळे होणारी कुचंबणा, भिन्नलिंगीविषयी वाटणारं आकर्षण, अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता, अशातच “सेक्स” (शरीर संबंधांवर) या विषयी जाणून घेण्याची ओढ, त्यासाठी अश्लिल साहित्य याचा घेतला जाणारा अधार, या सर्व बाबींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे, “बालक-पालक”. अनेक नाजूक विषयांना आपल्या समाजात निषिद्ध मानलं गेल्यामुळे निर्माण होणार्या प्रश्नाभोवती हा सिनेमा कुठेही अश्लील न होता पण नेमकेपणानं अगदी मर्मावर बोट ठेवतो आणि विचार करायला लावतो, अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटाने तब्बल १५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे मराठीतल्या बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांपैकी एक म्हणून नोंद ठेवावीच लागेल, पण बोल्ड विषय हाताळल्यामुळे मराठी चित्रपट विषयांच्या कक्षा रुंदावत आहेत हे या चित्रपटामुळे स्पष्ट होतं.
चला तर मग पाहूया, बालक पालक हा चित्रपट..
—
Leave a Reply