|| हरी ॐ ||
श्री संतोष भिवंदे या तरुणाचे बॉडीबिल्डींग मधील स्वप्न ऐन पन्नाशीत लखलखत्या सुवर्णपदकाने झाले हे श्री अनुप दळी यांच्या दिनांक १५ जानेवारी, २०१४च्या दैनिक ‘प्रत्यक्ष’ मधील राष्ट्रगंगेच्या तीरावरील सदरात एका स्पेशल लेखाद्वारे वाचण्यात आले. या नेत्रदीपक यशा बद्दल श्री संतोष भिवंदे यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा..!! तसेच दैनिक ‘प्रत्यक्ष’च्या संपादकीय टीमने नेहमीच प्रसिद्धविन्मुख, समाजाच्या भल्यासाठी काही चांगले करू पाहणाऱ्या, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या, विशेषत: सध्याच्या शोशल मिडिया, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, समाजकारण आणि असंख्य गरीब, होतकरू आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींच्या व्यक्तीमत्वांचा आणि त्यांच्या व्याक्तीत्वांचा विविध लेखाद्वारे या आधी परिचय करून दिला आहे. आणि अश्या जिद्दी, स्वत:च्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्या, शांत, सुस्वभावी, गुरुजनांवर विश्वास ठेवणारा आणि आदर करण्याऱ्या व्यक्तिमत्वाचीही ओळख दैनिक ‘प्रत्यक्ष’ने करून दिली त्याबद्दल पुन्हा आभार !
एकंदरीत पन्नास वर्षाचा प्रवास आणि शरीरसौष्ठवा बद्दलची आवड संतोषला स्वपपूर्ती पर्यंत स्वस्थ बसू देत नव्हती. सतत एकच धैयाध्यास मनात ठेऊन डॉ.अनिरुद्ध जोशींनी सांगितलेल्या मार्गाने आणि सोप्या पद्धतीने स्वत:च्या शरीर सौष्ठवाचा, स्वत:चा आणि कुटुंबियांचा जीवन विकास करीत आपल्या ध्यैयापर्यंत पोहोच्यासाठी सतत मेहेनत घेऊन त्या संधीची श्रद्धा आणि सबुरीने वाट बघितली आणि त्याचे नेत्रदीपक यश पदरी पडलेच परंतु भविष्यात बॉडीबिल्डींग क्षेत्रात याहीपेक्षा उंच भरारी मारण्याची स्वप्ने डोळ्यासमोर दिसू लागली. आपल्या यशाचे खरे मानकरी आणि शिल्पकार डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशीच आहेत हे ठाम मत त्याने ते पदक डॉ.अनिरुद्ध जोशींच्या गळ्यात घालून कृतज्ञापूर्वक कृतीने स्पष्ट केले.
मुख्य म्हणजे स्वत:वर असलेला विश्वास, जिद्द, मेहनत, सातत्य, स्वप्न आणि गुरुजनांनाचे योग्य मार्गदर्शन, वेळोवेळी मिळालेले कुटुंबियांचे, मित्रांचे प्रोत्चाहन, त्यांच्यावरील विश्वास असे नेत्रदीपक यश खेचून आणू यशस्वी झाले. धन्य ते गुरु, आईवडील आणि कुटुंबीय…! यानिमित्ताने काही शब्द कवितेतून व्यक्त करावेसे वाटतात ते पुढील प्रमाणे :-
बऱ्याच जणांना वाटत असतं
आपणही बॉडीबिल्डर व्हावं !
तरुणाईत असतात स्वप्न रंगवलेली
कुठल्याश्या सिनेमात पाहिलेली !
केला निग्रह बॉडीबिल्डींगचा,
शपथेवर जॉईन केल्या जिमचा !
दोन दिवस जोर बैठकांची साद
अंग दुखल्याने सोडला नाद !
शरीरावर मेद न वाढण्याच्या बोलीवर,
अतिरिक्त खाण्यावर लावला ब्रेक !
गरम गरम चमचमीत बघितल्यावर,
राहिला नाही सय्यम तोंडावर !
म्हणून म्हणावेसे वाटते…
सलाम श्री संतोषजींना,
सलाम पन्नाशीतल्या बॉडीबिल्डरला,
सलाम संतोषजींच्या गुरुजनाला !
सलाम त्यांच्या जिद्दीला,
सलाम त्यांच्या कंट्रोलला,
सलाम त्यांच्या स्वप्नांना,
सलाम त्यांच्या धैय्यवादाला,
सलाम त्यांच्या एकानिष्ठेला,
सलाम लखलखत्या सुवर्णपदकाला !
शुभेच्छा, भविष्यातील बॉडीबिल्डींग स्पर्धांना !
जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply