नवीन लेखन...

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आणि मिस्टर परफेक्टनिष्ट आमीर खान

आमीरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. त्यांचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी झाला. आमीरचा जन्म मुंबई येथे ताहिर हुसैन व झीनथ हुसैन , या चित्रपट निर्माताच्या घरात झाला. आमीर चार भावंडांत सर्वात मोठा, त्याला एक भाऊ अभिनेता फैजल खान आणि दोन बहिणी फरहात आणि निखात खान आहे. पुतण्या इम्रान खान एक समकालीन हिंदी चित्रपट अभिनेता आहे. आमीर खानचे शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत. व नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण संत ॲन च्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावी चे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम येथून पूर्ण केले. गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमीर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. ‘यादो की बारात’ या सुपरहिट चित्रपटात या चिमूकल्या आमीर खानने बॉलीवूड एण्ट्री केली होती. १९७३ साली आलेल्या यादों की बारात ह्या चित्रपटामध्ये आमीर खानने बाल कलकार म्हणून काम केले होते. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधू ची तरुण भूमीका निभवलि. त्यानंतर १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. आपल्या प्रेमीकेवर होणाऱया बलात्काराचा सूड घेण्याच्या इर्शेने गुन्हेगारी पार्श्वभूमीत खेचला जाणारा आमिर खान ‘राख’ या क्राईम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील साम्यता दाखवून देणाऱया ‘रंग दे बसंती’ मधून आमिरने पुन्हा एकदा सामाजिक आणि ऐतिहासिक विषयाला हात घातला होता अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये आमिरने अनेक सिनेमांसाठी लूक बदलले आणि प्रत्येकवेळी तो वेगळ्या अंदाजात दिसला. ‘दंगल’ या नवीन सिनेमात आमिर कुस्तीवीर महावीर सिंह फोगटच्या भूमिकेत दिसला आहे. या सिनेमासाठी त्याने वजन वाढवून ९० किलो केले होते. आमिरचे सध्या एका सिनेमासाठी ८ कोटी रुपये मानधन आहे. तसेच, आमिर नफ्यात ४० टक्के शेअर्ससुध्दा ठेवतो. तो एका जाहिरातसाठी ४ कोटी रुपये घेतो. त्यांच्याकडे Titan, Godrej सारखे प्रसिध्द ब्रँड्स आहेत.आमिरने ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी ३ कोटी रुपये घेतले होते. सोबतच, तो टीव्ही शोचा सर्वात महागडा होस्ट बनला होता. आमीर खान आणि किरण राव २००५ मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले होते. आमीर आणि किरण यांची भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. आशुतोष गोवारिकर यांनी निर्मिती केलेल्या चित्रपट ‘लगान’ मध्ये किरण राव असिस्टंट डायरेक्टर होत्या. लग्नानंतर किरण राव यांनी ‘धोबी घाट’ या चित्रपटाचे डायरेक्शन केले. आजाद असे या दोघांच्या मुलाचे नाव आहे. किरण राव आमिर खान याची दूसरी पत्नी आहे. रीना दत्ता ही आमिरची पहिली पत्नी आहे. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..