राणी मुखर्जीने करिअरची सुरुवात ‘बियेर फूल’ या बंगाली चित्रपटातून केली. यात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे१९९७ साली आलेल्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी झाला.१९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. . यानंतर तिने ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘साथिया’ यासारख्या हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. ‘नो वन किल जेसिका’ या चित्रपटात तिने कणखर पत्रकाराची भूमिका साकारली.सावारिया’ या चित्रपटात राणीने ग्लॅमरस भूमिका साकारली. कभी अलविदा ना कहना या चित्रपटात राणीने खूपच वेगळी भूमिका साकार केली. ‘पहेली’ या चित्रपटात राणी मुखर्जीने पारंपारिक मारवाडी महिलेची भूमिका सादर केली.’बंटी आणि बबली’ या चित्रपटात ‘ब्लॅक’ या चित्रपटात राणीने अंध आणि मुक्या मुलीची भूमिका केली होती. ‘वीर झारा’ हा तिच्या करियर मधील उत्तम चित्रपट होता. राणी मुखर्जीने प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत २०१४ मध्ये विवाह केला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राणी मुखर्जीची गाणी
https://www.youtube.com/watch?v=_CGOTyBWlbw
Leave a Reply