पूनम ढिल्लन १९७७ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकून प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९६२ रोजी झाला. असे म्हटले जाते, की एका मॅगझिनमध्ये पूनम यांचे छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना ‘त्रिशुल’ सिनेमाची ऑफर दिली होती. सुरुवातीला पूनम यांची ऑफर नाकारली होती, मात्र नंतर त्यांनी तो सिनेमा स्वीकारला होता. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे आयुष्यच पालटून गेले. ‘त्रिशुल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ‘त्रिशुल’ या सुपरहिट सिनेमाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा करणा-या पूनम यांची राजेश खन्नांसोबत ऑन स्क्रिन जोडी जमली होती. दोघांनी ‘निशान’, ‘दर्द’, ‘आवाम’, ‘जय शिव शंकर’, ‘रेड रोज’), ‘जमाना’ या सिनेमांमध्ये एकत्र काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली होती. १९८८ मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठाकरियासोबत लग्न केले. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. पूनम यांना पाहताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले होते. पूनमकडे आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर जोपर्यंत त्यांचा होकार आला नाही, तोपर्यंत दररोज ते त्यांना एक गुलाबाचे फूल पाठवत होते. अशोक यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पूनम यांनी सिनेमात काम करणे कमी केले होते. १९९२ मध्ये आलेल्या ‘विरोधी’ या सिनेमानंतर जवळजवळ पाच वर्षे पूनम यांनी इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला होता. १९९७ मध्ये ‘जुदाई’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply