सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. सलमान खानचा जन्म२७ डिसेंबर १९६५ रोजी झाला.सलमान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमान यांचा दुसराच चित्रपट ‘मैंने प्यार किया’ सुपरडूपर हिट झाला. या चित्रपटाच्या गाण्यांबरोबरच सलमान यांनी या चित्रपटातून आपले अभिनयाचे नाणेही खणखणीत वाजवून दाखवले आणि बॉलिवुडला एक नवा स्टार मिळाला. बॉलिवूडमध्ये दबंगची ओळख याच चित्रपटातून चाहत्यांना झाली. सलमान यांचा वॉंटेड, दबंग, दबंग-२ आणि एक था टाइगर या सर्व चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पेक्षा ही जास्तीचा गल्ला केला. या चित्रपटाच्या व्यतिरिक्त सलमान खान यांनी साजन, हम आपके हैं कौन, तेरे नाम आणि हम दिल दे चुके सनम या सारख्या चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच सलमानने रियलिटी शो ‘दस का दम’ आणि ‘बिग बॉस’ द्वारे टी.व्हीवर आपली हजेरी लावून चाहत्याना भुरळ घातली. तसेच बॉलिवूडच्या दबंगला दुसऱ्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांना तब्बल ५० कोटी रुपये मोजावे लागतात. सलमान खान यांचे ‘एस.के.बी.एच’ प्रॉडक्शन म्हणजेच सलमान खान बिंग ह्यूमन प्रॉडक्शन या नावाने त्याची स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे. या प्रॉडक्शन कपंनीची सुरुवात सलमानने २०११ मध्ये केली होती. या प्रॉडक्शन कपंनी द्वारे पहिला चित्रपट ‘चिल्लर पार्टी’ बनवण्यात आला या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. सलमान खान बिंग ह्यूमन नावाने सामाजिक संस्था देखील चालवतो. त्याच प्रमाणे बॉलिवूडचा दबंग गणपती बाप्पाचा भक्त आहे. सलमान चे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे. सलमान आजचा सुपरस्टार असला तरी, तो इतक्या सहजतेने इथपर्यंत पोहोचलेला नाही. सलमान यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले, खस्ता खालल्ल्या. काळवीट शिकार प्रकरण, हिट अँण्ड रन प्रकरणामुळे त्याच्या डोक्यावर नेहमीच अटकेची टांगती तलवार राहिली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply