सोळा वर्षांच्या असताना लिसा रे यांनी मॉडलिंगच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९७२ रोजी कॅनडातील टोरँटो येथे झाला.लिसा रे यांनी पहिल्यांदा लोकांचे लक्ष्य् बॉम्बे डाईंगच्या एका जहिरातीकडे वेधले होते. यात ती अभिनेता शशी कपूरचा मुलगा करण कपूरसह दिसली होती. नंतर ती ग्लॅड रॅग्सच्या मुखपृष्ठाोवर लाल रंगाच्या स्िवम सूटमध्येु दिसली. नंतर तिला अनेक मासिकांनी आपल्या मुखपृष्ठाॅवर जागा दिली. लिसाने प्रदीर्घकाळ मॉडलिंग केल्यानंतर अभिनयक्षेत्राकडे वळली. सर्वात प्रथम तिने तमिळ चित्रपट नेताजीमध्येो काम केले. २००१ मध्ये लिसाने बॉलीवूडमध्येत कसूर या चित्रपटामधून प्रवेश केला. नंतर तिने दीपा मेहतांचा चित्रपट वॉटर मध्येे काम केले. तिने कॅनडा, युरोप आणि अमेरिकेतील काही चित्रपटही केले आहेत. लीसा रे, अभिनेत्री म्हणून `वाटर`, `कसूर` आणि `बॉलिवूड-हॉलिवूड` सारख्या चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री लीसा रे यांना २००९ मध्ये मल्टिपल मायलोमा म्हणजेच अस्थिमज्जा कॅन्सर झाल्याचं पुढं आलं. १०-११ महिने त्या या आजारासोबत लढत होत्या. कॅन्सरसोबत यशस्वी लढा देत तिनं त्यावर विजय मिळवला. त्यासाठी तिनं टोरंटोतील प्रिंसेस मार्गारेट हॉस्पिटलमध्ये आपला उपचार केला आणि स्टेम सेल ट्रांसप्लांट करवलेत. आता लिसा रे यांनी पुन्हा आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply