मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या मधुबाला यांची कारकीर्द मात्र शापित ठरली. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. लहानपणी बेबी मुमताज म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे ‘मधुबाला’ असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. त्यांना एकुण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला आपल्या आईवडिलांची पाचवी मुलगी होती. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता. .मधुबालावर तिच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. मा.मधुबाला खूप भावूक होत्या. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीही पार्टी, प्रीमिअरमध्ये दिसली नाही. ‘अमर’ सिनेमातील एका सीनमध्ये निम्मी यांनी दिलीप कुमार आणि मधुबाला यांना डान्स स्टेप्स शिकवले होते, परंतु मधुबाला यांची एक स्टेप चुकीची केली, त्यामुळे सर्वांनी त्यांची खिल्ली उडवली होती. खिल्ली जेव्हा गंभीर होत गेली तेव्हा मात्र निम्मी यांना मधुबाला यांची माफी मागावी लागली होती. मधुबाला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘निम्मीने मेकअप रुममध्ये येऊन माझी माफी मागितली होती. १९४२ साली आलेल्या ‘बसंत’ या सिनेमाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून १९४७ मध्ये ‘नीलकमल’ या सिनेमात त्या पहिल्यांदा झळकली होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता. ‘दिल की रानी’ हे दुस-या सिनेमाचे नाव. १९४८ मध्ये मधुबाला यांचा ‘अमर प्रेम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सर्व सिनेमात मा.मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकली होती. या सिनेमानंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकीजच्या ‘महल’ सिनेमात काम केले होते. ‘महल’ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याकाळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने काम केले होते. अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद या आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने स्क्रिन स्पेस शेअर केली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकुण ६६ सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. १९४४ मध्ये ‘ज्वार भाटा’ सिनेमाच्या सेटवर मधुबालाची भेट दिलीप कुमार यांच्यासोबत झाली. या काळात मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम करु लागली होती. त्यावेळी तिचे वय १८ वर्षे तर दिलीप कुमार यांचे वय २९ वर्षे होते. ‘मुगल-ए-आझम’ हा सिनेमा तयार होण्याच्या नऊ वर्षांच्या काळात या दोघांचे प्रेम अधिक फुलले. दिलीप कुमार यांच्यासह लग्न करण्याची तिची इच्छा होती. मात्र दिलीप कुमार यांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले. मधुबाला किशोर कुमार यांची चौथी पत्नी होती. किशोरकुमार यांच्या बरोबरचे लग्न ही बाब दोघासाठी कसेतरी जगण्यासाठी केलेली तडजोड होती जिचे अंतिम रूप त्यांना माहित होते. मधुबालाला हृदयरोग होता आणि १९५० पासून तिच्या आजारावर उपचार चालू होता. परंतु तिने ही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवली. ह्रदयविकारामुळे ती कधीही आई होऊ शकत नव्हती हे डॉक्टर्सनी सांगितल्यामुळे तो हर्ष देखील तिला कधीच मिळणार नव्हता. निम्मी, नादिरा आणि संगीतकार नौशाद अशी तीन चार मंडळीच तिला मित्र म्हणून लाभले होते. लग्नानंतर अंधेरी मध्ये केव्हातरी नौशाद यांच्या घरी ती ये-जा करायची. अशाच एके दिवशी नौशाद पतीपत्नींनी तिला नैराश्याने रडताना पाहिल्यावर किशोर बरोबर फारकत घेण्याचा सल्ला दिला व पुनश्च नव्या जोमाने चित्रपटात येण्याचा आग्रह केला, पण फुलात तो जोम आता राहिला नव्हता. नौशादना उत्तर म्हणून तिने फक्त एक “शेर” ऐकीवला :
“जब कश्ती साबित-ओ-सालीम थी
साहिल कि तमन्ना किसको थी ?
अब ऐसी शिकस्त कश्ती में
साहिल कि तमन्ना कौन करे ?…”
हिंदी समीक्षक मधुबाला यांच्या अभिनय काळाला ‘स्वर्णयुग’ म्हणतात. नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने मधुबाला यांचे तिकीटा काढून मान दिला होता. मधुबाला यांचे निधन २३ फेब्रुवारी १९६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply