नवीन लेखन...

बोध कथा – उंदीर आणि बिल्ली मौसी

स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले,  त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा  कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो  स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय?   माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही.     स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती.  उन्दिरांच्या म्होरक्यांनी,  तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे  बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे.  बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या  समोर येऊन  कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे.

असेच एकदा बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर आली. गोड स्वरात गाणे म्हणू लागली.
नंदन वन के सब जानवर
शेर-बकरी, चूहा बिल्ली
एक घाटपर पिए पानी.
चूहों का म्होरक्या मुर्दाबाद
बिल्ली मौसी जिंदाबाद.
माझ्या प्रिय उन्दिरांनो, तुम्हाला माहित नाही, तुमच्या म्होरक्यांनी तुम्हाला जमिनीखाली अंधार्या जगात डांबून ठेवले आहे. इथे बाहेर बघा, सूर्य प्रकाश आहे, प्रसन्न वातावरण आहे. माझ्याशी मैत्री करा, तुम्हाला कुणाचेच भय राहणार नाही.  मधुर फळांच्या रस आणि गोड फळे तुम्हाला खायला मिळतील.   म्होरक्याची पर्वा करू नका, चला बाहेर या, माझ्या सोबत मौज करा, अंधाराच्या राज्याचा नाश करा.   उन्दिरांनो  बोला बुर्ज्वा म्होरक्या मुर्दाबाद, बिल्ली मौसी जिंदाबाद.
आजाद नावाच्या उन्दिर, म्होरक्यांच्या जाचक नियमांना त्रासून गेलेला होता. त्याला बिल्ली मौसीचे म्हणणे खरे वाटू लागले.  पण बिल्ली मौसीची भीतीही वाटत होती. स्वभावाप्रमाणे बिल्ली मौसी, बिळाबाहेर विष्ठा करून गेली. बिल्ली मौसी दूर जाताच आजाद नावाचा उंदीर बिळाबाहेर आला. बिल्ली मौसीच्या  विष्ठे जवळ जाऊ लागला, दुसर्या उन्दिरांनी त्याला मना केले, पण त्याने ऐकले नाही.  बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ येऊन, त्याने त्या विष्ठेचा वास घेतला. विष्ठेत असलेल्या  परजीवींनी लगेच आजादच्या शरीरात प्रवेश केला.  त्या परजीवींनी आजादच्या डोक्याचा  ताबा घेतला. आजादची विचार शक्ती नष्ट झाली.   आता आजाद परजीवींच्या इशार्या वर नाचू लागला. आजादला वाटले, बिल्ली मौसी खरेच म्हणते, नंदनवनातल्या सर्व प्राण्यांनी एकत्र राहिले पाहिजे. अर्धवट आणि  अतिशहाणे  उन्दिरांचे म्होरके आपल्या स्वार्था साठी बिल्ली मौसी  विरुद्ध आमच्या डोक्यात विष कालवितात जेणेकरून त्यांचे राज्य अबाधित  राहो.  त्याने जोरात नारा लावला, उन्दिरांच्या राज्याचा नाश होवो, बिल्ली मौसी जिंदाबाद म्हणत आजाद बिल्ली मौसीच्या शोधात निघाला. बिल्ली मौसी एका झाडाखाली बसलेली होती, ती आजाद सारख्या मूर्ख उन्दिराचीच वाट पाहत होती. बिल्ली  मौसीच्या जवळ येऊन  आजाद म्हणाला मौसी मी त्या मूर्खांचे राज्य सोडून आलो आहेत, मूर्ख  उन्दिरांचा म्होरक्या म्हणतो बिल्ली मौसी उन्दिरांना  खाते, खोटे बोलतो ना तो. बिल्ली मौसी गालात हसली, तिने अलगद आजादला  आपल्या पंज्यात पकडले आणि त्याला म्हणाली, मूर्खा तुमचा म्होरक्या खरेच म्हणतो, मी  तुझ्या सारख्या कोवळ्या उन्दिराना  आनंदाने खाते, असे म्हणत तिने आजादला गटकले.

स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले.  मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.

 

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..