आचार्य अत्रे यांच्या “अत्रे पिक्चर्स” या बॅनर अंतर्गत त्याकाळात खूपच विवाद निर्माण मराठीतला “बोल्ड” चित्रपट म्हणता येईल. मीनाक्षी शिरोडकर, मास्टर विनायक यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे हा चित्रपट लक्षात राहतो तो सकस अभिनय आणि अत्रेंच्या दिग्दर्शनासाठी. एक देशभक्त जटाशंकर यांच्या भाषणामुळे औदुंबर नामक युवकाच्या मनावर ब्रम्हचार्य या शब्दाचा इतका प्रभाव पडतो की सर्व सुखं जुगारुन आचार्य चंडीराम यांच्या संस्थेत दाखल होतो, तिथे त्याची भेट किशोरी नामक एका सुंदर तरुणीशी होते आणि औदुंबरची ब्रम्हचर्याची परिक्षा होते, ही या चित्रपटाची कथा आहे. त्याकाळात सनतानवादी संघटनांनी बिकीनि दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेतल्यामुळे चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकला होता. पण तितकाच लोकप्रिय ठरला हे विशेष.
चला तर पाहूया मग या चित्रपटातील एक गाणे..
—
Leave a Reply