साहित्य:
२ कप ब्रेडचा चुरा
१ कप उकडलेला बटाट्याचा किस
अर्धी वाटी ओलं खोबरं
चवीनुसार हिंग, मीठ, तिखट, हळद
१ कांदा
१ बारीक चिरलेली मिरची
आवडीप्रमाणे कोथिंबीर
२-३ चमचे तेल
१ वाटी ताक
मोहरी, हिंग, हळद घालुन केलेली फोडणी
१ चमचा लिंबाचा रस
कृती:
सर्वप्रथम बटाट्याचा किस, ताक व लालसर कडा काढलेल्या ब्रेडचा चुरा एकत्र करुन या मिश्रणात अंदाजानुसार आणि चवीप्रमाणे हिंग, हळद, तिखट, मीठ घालून गॅसवर मंद आचेवर शिजत ठेवावे. गोळा पातेल्यात फिरायला लागला की लगेच उतरवावे. ताटात कापड टाकून त्यावर वरील मिश्रण घाला व पातळ थापावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ, ओले खोबरे, लिंबाचा रस व चिमूटभर साखर घालून याचे सारण तयार करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद घालुन केलेली फोडणी घालावी. व हे सर्व थापलेल्या वड्यांवर पसरवावे. त्यावर सुरीने उभ्या चिरा पाडून गोल गुंडाळ्या कराव्यात. अशाप्रकारे ब्रेडच्या सुरळीच्या वड्या तयार. या वड्या आपण हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करु शकतो.
— नेहा कामथे
Leave a Reply