नवीन लेखन...

ब्रेड (Bread)

पांढरा ब्रेड vs ब्राऊन ब्रेड

“डॉक्टर; मी रोज सकाळी हेल्दी नाश्ता करते. फ्रेश सँडविच. त्यातही मी मुद्दाम पांढरा ब्रेड टाळते ब्राऊन ब्रेडच वापरते.” एका आरोग्याविषयी सजग (?) असलेल्या रुग्णेकडून आलेला प्रतिसाद.

“रोज नाश्त्यात सँडविच खाणं हेल्दी आहे असं कोण म्हणालं? आणि ब्राऊन ब्रेड वापरला की ते अधिक आरोग्यदायी होतं असं कोणाचं मत?”

अर्थात माझे हे प्रश्न मुळातच व्यर्थ होते म्हणा. कारण या दोन्हींचं समोरच्या स्मार्ट लेडी कडून येणारं एकमेव उत्तर ‘इंटरनेट’ हेच असणार आहे हे माहिती असूनही विचारण्याची चूक मी केली होती.

पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा. हो; अंधश्रद्धाच. कधी ब्राऊन ब्रेडच्या पॅकेटवरचे घटक वाचण्याचे कष्ट आपण घेतो का? कधीतरी हे कष्ट घ्या; पहिला घटक असतो तो बहुदा ‘enriched wheat flour’ आणि पुढे कुठे तरी ‘whole wheat flour’ असा शब्द असतो. आता असं दोन वेळा का लिहिलं जातं तर यातला पहिला घटक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो असतो मैदा!! जवळपास ५०-५०% अशा प्रमाणात या ब्रेडमध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ असं मिश्रण असतं. थोड्क्यात; हा ब्रेड आरोग्यदायी असतो हे केवळ मार्केटिंग असून यात फारसं काही तथ्य नाही.

पूर्णतः गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या ब्रेडला whole wheat bread असं म्हटलं जातं. मात्र हा प्रकारही विशेष आरोग्यदायी आहे असं समजण्याची चूक करू नका. कारण हा बनवत असताना जरी संपूर्ण गव्हाचा वापर केला असला तरी त्याच्या बनण्याच्या प्रक्रियेत त्यातले पोषक घटक नष्ट होतात आणि मग हे नष्ट झालेले घटक ‘वरून घालून’ त्यांना enriched with किंवा fortified with असं छानसं नाव देऊन दडवलं जातं. याशिवाय त्या ब्रेडचं रंग रूप आकार सुधारण्यासाठी जे रासायनिक पदार्थ घातले जातात त्यांनाही विसरून चालणार नाही. Multigrain bread चीदेखील तीच कथा.

गोव्यामध्ये पूर्ण गव्हापासून बनवलेला ब्रेड मिळतो. मध्य पूर्वेतील देशांत मूळ सापडणाऱ्या या प्रकाराला त्या देशांत pita bread असं तर गोव्यात पोळी असं म्हणतात. गोव्यात या प्रकाराला तुलनेत चांगला मानलं जात असलं तरी प्रत्यक्षात ‘दगडापेक्षा विट मऊ’ इतकाच काय तो फरक!

मुळात ब्रेड हा पदार्थ आंबवणे वा किण्वीकरण प्रक्रिया यांचा समावेश करूनच बनवला जात असल्याने (अपवाद Non yeast bread चा) तो पचायला जडच आहे. त्यातच विविध रसायनांची भर पडल्याने त्याचे आरोग्याच्या दृष्टीने ‘अवमूल्यन’ अधिक प्रमाणात झालेले असते. असा पदार्थ शक्यतो टाळणेच हितावह. क्वचित कधीतरी खाण्यात आल्यास सोबत गरम पाणी अवश्य घ्यावे. मात्र कोणताही ब्रेड हा ‘हेल्दी’ आहे या गैरसमजात मात्र मुळीच राहू नका.

आता रोजच्या नाश्यात ब्रेड घ्यायचा नाही तर काय खायचं असा भाबडा प्रश्न कोणाला पडला असल्यास त्यांना चपाती/भाकरी यांचा अचानक विसर पडला आहे का? याचा विचार अवश्य करावा!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

https://gharoghariaayurvedblog.wordpress.com/2017/03/08/ब्रेड/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..