नवीन लेखन...

ब्रेन ट्युमर एक गंभीर आजार

अनेकांना डोकेदुखीचा त्रास झाला की, त्यावर ते पेन किलर घेतात. तसे पाहता डोकेदुखी ही सर्वसाधारण समस्या आहे, पण ही नेहमीची डोकेदुखीची समस्या काहीही केल्या बंद होत नसेल तर हे ‘ब्रेन ट्युमर’चे एक लक्षणही असू शकते व यावर वेळीच उपाययोजना न केल्यास हा आजार जिवावर बेतू शकतो.
शरीरात बनणारे सेल्स काही वेळेनंतर नष्ट होऊन जातात आणि त्या सेल्सच्या जागी नवीन सेल्स बनतात. ही एक साधी क्रिया आहे, पण ही क्रिया जेव्हा चुकते तेव्हा ट्युमरचे सेल्स बनने चालू होतात आणि ब्रेन ट्युमरचा त्रास चालू होतो. ब्रेन ट्यूमरला मस्तिष्क कॅन्सरही म्हटल्या जाते. ब्रेन ट्यूमर ३ ते १५ वर्षे वयोगटामध्ये किंवा ५० वर्षांच्या व्यक्तीलाही होऊ शकतो. पुरुष किंवा महिला यांना कोणालाही हा आजार होतो. त्यामुळे या डोकेदुखीकडे दुर्लक्ष न करता त्यावर निदान करणे गरजेचे आहे.

ट्यूमरचे प्रकार ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमधील पेशी कुठल्याही नियंत्रणाविना वाढत राहतात. ही वाढ पटकन लक्षातही येत नाही. हा घातक आजार दोन प्रकारचा असतो.

बिनाइन ट्यूमर या प्रकारात मेंदूच्या नेहमीच्या पेशींना कुठेही धक्का न लावता ट्यूमर वाढतो आणि ऑपरेशन करून हा ट्यूमर काढून टाकला तर या विकारापासून मुक्ती मिळू शकते.मेलिग्नेंट ट्यूमर या प्रकारात अधिक घातक असतो, तो असतो ब्रेन कॅन्सरचा. ऑपरेशन केले, तरी कॅन्सरग्रस्त पेशींची पुन्हा वाढ होऊ शकते. यातही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात प्राथमिक स्वरुपाच्या ब्रेन कॅन्सरची सुरवात मेंदूमध्येच होते, तर दुसऱ्या प्रकारात कॅन्सरची वाढ शरीराच्या एका भागात होते आणि ती मेंदूपर्यंत पसरते.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे
ब्रेन ट्यूमरचे पहिले लक्षण म्हणचे डोकेदुखी होय. सकाळच्या पहरी जास्त व जसजसा दिवस उजाळतो तसा कमी कमी होत असते.
‘पेन किलर’ने डोके दुखीवर तात्पुर्ता आराम मिळत असतो. परंतु औषधीची क्षमता कमी झाल्यानंतर पुन्हा तीव्रतेने डोके दुखायला लागते.
ब्रेन ट्यूमरमध्ये डोके दुखी व्यति‍रिक्त इतर लक्षणे ही आहेत. जसे की, वारंवार शरीराचा तोल जाणे, पायांत अशक्तपणा येणे, चालताना अडखळणे, दृष्टिदोष येणे, तिरळेपणा, बोलण्यात अडखळने, वाढ खुंटणे, मानसिक अस्वस्थता, शुद्ध हरपणे तसेच झोपाळू वृत्ती बळावणे कमी ऐकू येणे आदी लक्षणे जाणवतात.
मस्तिष्क अथवा त्या संबंधित क्रियामध्या अचानक परिवर्तन घडत असते. डोके जड पडणे, स्मरणशक्तीचा लोप पावणे, डोक्यासोबत मान दुखणे तसेच शुध्द हरपरे अशी लक्षणे रोग्यात जाणवत असतात.

मस्तिष्क कॅन्सरचे निदान कसे कराल.?
१) ब्रेन ट्यूमरवर उपचार लक्षण व परीक्षणाच्या काळात होऊ शकतो. परीक्षणानंतर विशेष प्रकारच्या चाचण्या कराव्या लागत असतात. डोक्याचा एक्स-रे, कॅट स्केन, मनक्यातील पाण्याचे परिक्षण यादीद्वारे या रोगाचा निदान करू शकतात. ब्रेन ट्यूमरवर प्रारंभिक अवस्थेतच उपाचार करणे शक्य होत असते.
२) शल्य चिकित्सा, रेडिओ थेरपी तसेच औषधीच्या माध्यमातून ब्रेन ट्यूमरवर आता प्रभावी उपचार केला जाऊ शकतो.३) डोके दुखीवर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टराचा सल्ला घ्यावा. ब्रेन ट्यूमरचे लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत परीक्षण करून घेणे हाच ब्रेन ट्यूमरवर प्राथमिक उपाचार आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..