” भक्ति म्हणजे काय?”
@ जेंव्हा भक्ति अन्नात शिरते
ती प्रसाद बनते
@जेंव्हा ती भुकेत शिरते
तिला उपवास म्हणतात
@ जेंव्हा ती पाण्यात शिरते
तिला तीर्थ संबोधतात
@ जेंव्हा ती प्रवासाला निघते
तिला यात्रा म्हणतात
@ जेंव्हा भक्ति संगीतात शिरते
तिला भजन,कीर्तन म्हणतात
@जेंव्हा ती लोकसंगितात शिरते
तिला भारुड म्हणतात
@जेंव्हा भक्ति घरात शिरते
तेंव्हा घर मंदिर बनते
@जेंव्हा भक्ति कृतित उतरते
त्याला सेवा म्हणतात
@ जेंव्हा भक्ति मानवात शिरते
तेंव्हा माणुसकी तयार होते. . .
Leave a Reply