आपले निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ईरोम शर्मिला हि १६ वर्ष आधी उपोषणाला बसली. तिला उपोषणाची प्रेरणा महात्मा गांधींपासून मिळाली होती. पण तिला एक माहित नव्हते. महात्मा गांधी एक चतुर राजनेता होते. उपोषण त्यांचे एक शस्त्र होते. या उपोषण रुपी शस्त्राचा किती आणि कसा वापर करायचा याची त्यांना चांगली कल्पना होती. त्यांनी या शस्राचा वापर नेहमीच योग्य रीतीने केला आणि आपले हेतू साध्य केले. पण ईरोम ठरली भोळी-भाबडी. तिचा वापर करणार्यांनी तिच्या भोवती एक प्रभामंडळ तैयार केले. ती त्या प्रभामंडळात अटकली.
आता एकच प्रश्न डोळ्यांसमोर येतो. कुणी १६ वर्ष उपाशी राहू शकतो का? उत्तर नाही. सरकारने तिला इस्पितळात बंदिस्त ठेवले होते. तोंडाच्या जागी नाकातून तिला अन्नद्रव्य दिले जात होते.(तांदूळ, भाज्या, डाळ इत्यादी). रुग्णांसाठी असलेली सुविधा तिच्यावर वापरल्या जात होत्या. अर्थात ती उपाशी नव्हती. तिला जिवंत ठेवण्यासाठी सरकारचा भरपूर पैसा हि बरबाद झाला. तिच्या उपोषणातला फोलपणा निश्चित ईरोमला हि कळत असेलच. पण ती हि राजू गाईडप्रमाणे स्वत:निर्मित प्रभामंडळ रुपी जाळ्यात अटकलेली होती आणि तिला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नव्हता. इस्पितळात राहून नाकाने अन्नद्रव्य ग्रहण करण्या अतिरिक्त ती काहीही करू शकत नव्हती. शेवटी हिम्मत करून तिने आपल्या भोवती असलेले प्रभामंडळ तोडले. नाकाच्या जागी तोंडातून जेवण घेण्याचा निश्चय केला. पण घरी आणि गावात तिचे कुणीच स्वागत केले नाही. कारण तिचा वापर करणारे तिच्या विरुद्ध झाले होते . तरीही मी तिची हिम्मतीची प्रशंसा करेल. अन्यथा असेच तडफडत तिचे जीवन व्यर्थ गेले असते.
भगवान बुद्धाने देशभर भ्रमण करून, आपल्या शिष्यांना दूरदेशी पाठवून, धर्माचा प्रसार केला होता. ईरोम शर्मिला हि या १६ वर्षांत देशभर फिरून ASFPA (अफ्सपा) विरुद्ध जनजागृती करू शकत होती. कदाचित तिच्या प्रयत्नांना यश हि आले असते. १६ वर्ष तिने व्यर्थ घालविले. पण म्हणतात ना ‘देर आये दुरुस्त आये‘. भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे.
Leave a Reply