नवीन लेखन...

भविष्यातील उर्जास्त्रोत: अणूउर्जा



एकविसाव्या शतकातील आर्थिक घडी ही आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीवर आधारित आहे. त्यात अमेरिका-चीनचा सहभाग महत्वाचा आहे. वैद्यकिय क्षेत्राप्रमाणेच नवीन उर्जास्त्रोत विकसित करण्यासाठी शत्रू देश मैत्रीच्या भावनेने सहकार्य करतात. अणू विभाजनातून ऊर्जेची निर्मीती होत असते. पण ही निर्मिती जर अणुमिलनाने झाली तर जगात ऊर्जेचा साठा कमी पडणार नाही, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यासाठी फ्रान्समध्ये एक प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत अमेरिका, युरोप, चीन, जपान व भारतातील शास्त्रज्ञ एकत्रितपणे काम करतात. हे देश प्रयोगशाळेचा खर्चदेखील विभागून घेतात. मागच्या शतकात तेल हे मुख्य ऊर्जास्त्रोत होते. त्यामुळे राष्ट्राराष्ट्रांमधे स्पर्धा व वैमनस्य निर्माण झाले. या शतकात अणुमिलन, सौरशक्ती व पवनयंत्रे चालवून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत झाले पाहिजे.

संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर, प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०.

कोणत्याही देशाच्या प्रगतीत आणि जडणघडणीत देशांतर्गत उर्जास्त्रोतांचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. मागच्या काही शतकांत खनिज तेल हा अनेक देशांसाठी महत्त्वाचा उर्जास्त्रोत होता आणि आजही असला तरी पुर्वीच्या तुलनेत आज त्याचे महत्त्व कमी होउ पहात आहे . खनिजतेलाचे संपुष्टात येउ लागलेले साठे आणि वाढणारी किंमत यामुळे हळुहळू विकसीत आणि विकसनशील राष्ट्रांची या उर्जाप्रकारावरची निर्भरता कमी होउ लागली आहे. नवनवीन उर्जाप्रकारांच्या संशोधनासाठी ही राष्ट्रे प्रयत्न करीत आहेत. सौर उर्जा, वारा आणि समुद्राच्या लाटांपासून मिळणारी पारंपारिक उर्जा ही कायमस्वरूपी असली तरी ती पुरेशी नाही. अशा वेळी अणूउर्जा ही उर्जेच्या क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणू शकते. यांच्या बरोबरीलाच सौरशक्ती आणि पवनयंत्रे महत्त्वाचे उर्जास्त्रोत ठरू शकतात. मागच्या दशकांत खनिजतेलावरून झालेली युद्धे आपण पाहिली आहेत. यावेळी अणूउर्जेच्या प्रश्नावरून भारत-चीन-अमेरिका आणि इतर राष्ट्रे महत्वाची भुमिका वटवू शकतात. अणूउर्जेकडे खनिजतेलाला पर्यायी आणि

मानवतेच्या कल्याणासाठी वापरला जाणारा उर्जास्त्रोत या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. हे हित जपताना

राष्ट्राराष्ट्रांत सहकार्याची भावना असणे महत्त्वाचे आहे. संदिप वासलेकरांच्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात याविषयी फार उत्तमरित्या उद्बोधन केलेले आहे.

— तुषार भामरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..