नवीन लेखन...

भव्य दुष्काळी पर्यटन महोत्सव

 

राज्यात गेल्या १०० वर्षात पडला नाही असा भव्य दुष्काळ या वर्षी महाराष्ट्रात पडला. या दुष्काळाच्या संकटाचे रुपांतर पर्यटन रोजगाराच्या संधीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन जाहिर करत आहे भव्य दुष्काळी पर्यटन महोत्सव……

शहरी नागरिकांना, राजकीय नेत्यांना, ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळाचा जिवंत अनुभव घेता यावा यासाठी शासनाने भव्य दुष्काळी पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे धोरण निश्चित केले आहे. केरळ मेडीकल टुरिझम, दुबई शॉपिंग फेस्टिव्हल, पुण्याचा गणपती उत्सव पर्यटन, व्याघ्र दर्शन पर्यटन, खजुराहो-दार्जिलिंग-आग्रा पर्यटन महोत्सव इत्यादी महोत्सवापासून प्रेरणा घेऊन हा दुष्काळी महोत्सव जाहिर करण्यात आला. या दुष्काळी पर्यटन महोत्सवात सामील होण्यासाठी अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते, IPL क्रिकेट खेळाडू, सेलिब्रेटीज, संघ मालक, सिने नट नट्यांनी विना मोबदला सहभागी होण्यास मान्यता दिली असल्यामुळे या सेलिब्रेटीजच्या सहवासात दुष्काळ साजरा करण्याची अनोखी संधी पर्यटकांना मिळणार आहे… या सेलिब्रेटीज च्या सहवासात दुष्काळ साजरा करण्याची अनोखी संधी पर्यटकांबरोबरच दुष्काळग्रस्ताना मिळणार आहे.

या दुष्काळ सहली मुंबईपासून वातानुकूलित बसने सुरु होऊन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील महत्वाच्या दुष्काळपिडीत खेड्याना भेटी देऊन परत मुंबईला येतील. दुष्काळग्रस्त भागातील पाण्याच्या टंचाईमुळे संपूर्ण प्रवासात शुद्ध थंड मिनरल वाटर बाटल्या मोफत दिल्या जातील.

निसर्गरम्य मोकळ्या वातावरणात वातानुकुलीत तंबूत (अटेच बाथरूम टोयलेट) स्वतंत्र राहण्याची सोय.

दुष्काळ पर्यटन सुसह्य व्हावे म्हणून अमर्यादित देशी-विदेशी मद्यपानाची आणि ग्रामीण लाकडी चुल्हीवरील खमंग मटण भाकरी मांसाहारी भोजनाची सोय. दररोज रात्री कैम्प फायर मध्ये ग्रामीण सांस्कृतिक लावणी, मनोरंजनाचे कार्यक्रम.

आपले आवडते भाऊजी, दादा, बाबा, आबा, ताई, माई, आक्का यांची साथ संगत …।

खास आकर्षण: दुष्काळी कामाचे टेंडर …… दुष्काळी भागातील चारा छावण्या, पाण्याचे टॅंकर, टाक्या आणि दुष्काळासंबंधित कामाच्या वाटपाचे टेंडर भरून त्वरित कामाची वर्क ऑर्डर दिली जाईल.

— ठणठणपाळ परभणीकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..