नवीन लेखन...

भारतातील सर्वात वयोवृद्ध पालघरमध्ये

 शंभरीनंतरचे जीवन म्हणजे एक बोनस. आता तर नव्या फास्ट जीवनशैलीत सत्तरी गाठली तरी `लई झालं’ असा विचार बरेचजण करत असतात. अशा परिस्थितीत तब्बल १११ वर्षांचं आयुष्य जगायला मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट.

जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.

रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी यांचा जन्म ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यातील माकूणसार येथील शेतकरी कुटुंबात १२ मे १९०३ रोजी झाला. इयत्ता दुसरीपर्यंतच त्यांचे शिक्षण झाले आणि तेही जिल्हा परिषदेच्या शाळेत. मात्र विचार करा, १०० वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्याच्या त्या काळी अविकसित असतेल्या पालघरसारख्या भागात राहूनही त्यांनी दुसरीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांना थोडेफार वाचता येत असे, मात्र लिहिणे हा त्यांचा प्रांत नव्हता. ते फक्त स्वतःची स्वाक्षरी करु शकत.

बलदंड शरीरयष्टी प्रसन्न मुद्रा असलेले राऊत यांनी वयाच्या नवव्या वर्षी पद्मनाभ पंथाची दिक्षा घेतली होती. शेतकरी कुटुंबातील राऊत यांचा दुधाचा धंदा होता व भल्या पहाटे ते मुंबई येथे दूध घेवून जात असत. त्यांची स्वतःची एक जीवनशैली होती. दूध आणि दुग्धपदार्थसेवनाचा ते पुरस्कार करत असत.

ते महात्मा गांधी यांचे अनुयायी होते. त्यांनी १९४२ च्या चळवळीतही सहभाग घेतला होता. गांदीजींच्या भेटीनंतर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला, चहा सोडला, शाकाहारी जीवनशैली स्विकारली.

६ मे २०१४ रोजी सायंकाळी वयाच्या ११० वर्षे ३५९ व्या दिवशी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर माकूणसार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

— निनाद अरविंद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..