नवीन लेखन...

भारतीयांचा पहिला ब्रिटिश-विजय आणि सोबर्सचे अंतिम शतक





24 ऑगस्ट 1971 रोजी भारतीय कसोटी संघाने ब्रिटिश भूमीवरील आपला पहिलावहिला विजय साकार केला. 1971च्या हंगामातील हा मालिकेतील तिसरा सामना केनिंग्टन ओवलवर 19 ऑगस्टला सुरू झालेला होता. यजमानांनी पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. मग भारत 284 आणि पुन्हा पाहुणे 101. चंद्रा ऊर्फ भागवत चंद्रशेखर 18.1-3-38-6 !! 173 धावांचे आव्हान अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने चार गडी राखून गाठले. हा भारताचा इंग्लंडमधील पहिला मालिकाविजयही ठरला.

24 ऑगस्ट 1973 रोजी लॉर्ड्स मैदानावर नाबाद 150 धावा काढून एक फलंदाज निवृत्त झाला. धावफलकात त्याची नोंद नाबाद अशी आढळते. विज्डेनच्या वार्षिकांकात तो ‘पोटदुखी’मुळे निवृत्त झाला अशी माहिती मिळते. खरी बात मात्र औरच आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो 31 धावांवर नाबाद होता आणि अख्खी रात्र त्याने पोर्ट आणि ब्रॅन्डी पिण्यात घालवली होती. त्याच्या चित्तवृत्ती दुसर्‍या दिवशी फलंदाजीस उतरताना मद्यमय झालेल्या होत्या आणि आपण मैदानावरच उलट्या करू अशी शक्यता त्याला ‘त्या’ अवस्थेतही अस्वस्थ करीत होती. 8 बाद 652वर त्याच्या कर्णधाराने (रोहन कन्हाईने – हा आपल्या सुनील गावसकरांचा अत्यंत आवडता खेळाडू. त्यांच्या मुलाचे नाव रोहन त्याच्यामुळेच.) डाव घोषित केला. हे सर गारफील्ड सोबर्स यांचे सव्विसावे कसोटी शतक होते. बार्बडोस शासनाच्या एका संकेतस्थळावर या अवलिया खेळाडूचा सुंदर परिचय उपलब्ध आहे –

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..