एका तरूणीला दुसर्या एका तरूणीशी संवाद साधयचा होता. तिने मागचा पुढचा विचार न करता तिला प्रश्न केला ‘आर यू मराठी ऑर हिंदी ? ती मराठी अस उत्तर देताचा हिने तिच्याशी चक्क मराठी बोलायला सुरूवात केली. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्या दोघीही मराठी भाषिक होत्या त्याही मुंबईतील, मुबईत राहणार्या बहुसंख्य मराठी लोकांना हिंदी बर्यापैकी येते अर्थातच त्यांनाही येत असणार. पण त्या तरूणीन संवाद साधण्यासाठी आपल्या मातृभाषेची अथवा राष्ट्रभाषेची निवड न करता एका परक्या भाषेची निवड केली. हे अस का होत असाव ? कदाचित आपल्या देशातील लोकांना त्यांची मातृभाषा अथवा त्यांची राष्ट्रभाषा येत नसली तरी इंग्रजी बर्यापैकी येते असा आपण आपल्या मनाशी ठाम ठरवूनच टाकलय. उच्चमध्यमवर्गीय माणूस मग तो कोणत्याही जाती वा धर्मातील का असेना त्याच्या घरात इंग्रजी बर्यापैकी रूळ्लेय. ह्ल्ली तर आपल्या देशात लग्नपत्रिकाही मातृभाषेत आणि इंग्रजीत अशा दोन भाषेत छापल्या जावू लागल्यात पण भविष्यात त्या कदाचित फक्त इंग्रजी भाषेतच छापल्या जातील बायो-डेटा सारख्या, याची आता खात्री वाटू लागलेय. इंग्रजीमुळे मातृभाषेबरोबरच राष्ट्रभाषेलाही भविष्यात धोका संभंवन्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्या देशातील मातृभाषा आणि राष्ट्रभाषा आजही टिकून आहे त्यात सर्वात मोठ योगदान आपल्या देशातील चित्रपट सृष्टी आणि वर्तमानपत्र यांचच आहे. विज्ञान आणि गणिता सारखे जटील विषय मातृभाषेतच समजायला सोप्पे जातात हे तर भाषा तज्ज्ञांनीही मान्य केलय . पण हे सत्य आपल्या देशातील जनतेने अजूनही स्विकारल्याच जाणवत नाही. आपल्या देशात इंग्रजी माध्यमातील शाळांच प्रमाण दिवसेन – दिवस वाढतय आणि सरकारी शाळा ओस पडता आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या नोकर्यांचा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर येणारच आहे भविष्यात. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा असा गैरसमज आहे की इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यावरच आयुष्यात यशस्वी होता येत. इतर माध्यमातून शिकलेल्यांनाही ही इंग्रजी उत्तम येत हे मानायला हे तयार नसतात. पण इंग्रजी माध्यमातून शिकलेली मात्र बाकीच्या राज्य भाषांची बोलताना बर्यापैकी वाट लावतात हे मात्र निश्चित. प्रत्येक राज्याचा राज्यकारभार आणि न्यायालयीन कामकाज त्या त्या राज्याच्या राज्यभाषेत अथवा रष्ट्रभाषेतच व्हायला हवा तरच हे चित्र कही प्रमाणात बद्लेल कदाचित. पण आता पाटाखालून बरच पाणी वाहून गेलय. आता आपल्या देशात इंग्रजी भाषेबरोबर इंग्रजी संस्कृतीही मोठ्या प्रमाणात जोपासली, जपली आणि वाढविली जातेय. इंग्रजी माध्यमातील पाठ्यपुस्तकातून इंग्रजी संस्कृतीचे नाही तर फक्त भारतीय संस्कृतीचेच धडे दिले गेले पाहिजेत. इंग्रजी माध्यमातून शिकण म्ह्णजे आपल्या राज्यभाषेला आणि राष्ट्रभाषेला दुय्यम स्थान देणं असा त्याचा अर्थ होत नाही. पालकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी सोबतच त्यांना उत्तम राज्यभाषा आणि राष्ट्रभाषा येते की नाही यावर लक्ष ठेवायला ह्वं. इंग्रजी सोबतच त्यांना मातृभाषेतील आणि राष्ट्रभाषेतील पुस्तकेही वाचण्याची सवय लावायला हवी. आपल्या देशातील शहरी भागात राहणार्या लोकांना राज्यभाषेत आणि राष्ट्रभाषेत बोलायची लाज का वाटते तेच कळ्त नाही. आपल्या देशात इंग्रजीच स्थान तिसरं होत आणि ते तिसरं राहण्यातच देशाच हित आहे. इंग्रजी बोलण हा आपल्या जगण्याचा भाग असेल पण आपली मातृभाषा आणि आपली राष्ट्रभाषा जपण हा आपल्या अस्तित्वाचा भाग आहे हे विसरून चालणार नाही…
लेखक – निलेश बामणे
Leave a Reply