नवीन लेखन...

भाषेची गंमत – ‘ बर्मगठिव्का ’

अलीकडेच सातार्ला ( साताऱ्याला ) जाण्याचा योग आला . इथेही मोबाईल ( इकडे शेल्फोन म्हणतात ) धारकांची वाढती संख्या सहज नजरेत भरण्यासारखी होती . ज्याला पाहावे त्याच्या  मोबाईल हाताला आणि हात कानाला . इथल्या शेल्फोनधारकांच्या संभाषणात ‘ बर्मगठिव्का ’ आणि ‘ बर्मगठिव्तो ’ हे दोन शब्द पुन : पुन्हा उच्चारले जात होते .

ऐकून ऐकून कान आणि मेंदूचं पार भेंडाळं व्हायला आलं , मात्र ‘ बर्मगठिव्का ’ ही काय भानगड आहे याचा मला काहीच उलगडा होत नव्हता . कुतुहलापोटी मी प्रत्येक शेल्फोनधारकाचे संभाषण अगदी जीवाचे कान करू न ऐकू लागलो . यातून एक गोष्ट मात्र फायद्याची ठरली ती म्हणजे मोबाईल फोनच्या संबंधित बऱ्याच इंग्रजी शब्दांच्या देशीकरणाच मला चांगलाच उलगडा झाला . खालच्या बाजारातून वरच्या बाजारापर्यंत फेरफटका मारताना ‘ बर्मगठिव्का ’ चा उलगडा होईपर्यंत जी जी संभाषणे मी ऐकली त्यातले काही तुकडे जरी आपण ऐकले तरी आपल्या शब्दसंचामध्ये नवीन शब्दांची नक्कीच भर पडेल . तर ऐकूया

संभाषण –

क : आर्कवा धर्न ट्राय कर्तोय तुजा आप्ला सार्खा आव्टाफकव्रेचज दाव्तोय . कंचा हाय तुजा ?
ख : माजा यार्टेल ( एअरटेल ). तुझा ?
क : माजा ब्येस्नेल ( बी . एस . एन . एल .) ( कव्हरेज या शब्दाला इकडे असंख्य पर्याय आहेत . कौरेच , कौरेज , कव्रेज , करवेज आणि कर्वेजसुद्धा .)
ख : आर्आता आमच्याकड आयडय़ान् वडाफोनचंबी टावरं झाल्याती . आन् रिंज ( रेंज ) बी बरी घाव्ते .
क : आता हा कंचा म्हंन्लास वडा क् काय त्ये .
ख : हौ ऽऽ वडा वडाच . आर्पय्ला आरिंज म्हंजी संत्र न्हव्तं का , मगं हुच (HUTCH) झालं . आनात्ता वडाफोन .

आणखी बरंच काही संभाषण होत असतं . त्यात अधूनमधून ‘ बर्मगठिव्का ’ व ‘ बर्मगठिव्तो ’ ही चालूच असतं . हात्तिच्यामाय्ला ’, ‘ च्या माय्ला ’ आणि ‘ चॅआय्ला अशा ठराविक शब्दांचा योग्य आणि अयोग्य ठिकाणी भरपूर वापर होत असतो . बाकी सर्व कठिण शब्दांचे अर्थ मी लावू शकत होतो परंतु हे ‘ बर्मगठिव्का ’ माझी पाठ सोडत नव्हतं . शेवटी न राहवून
एकाचं तोंड आणि फोन बंद झाला तेव्हा त्याला मुद्दामच विचारलं .

मी : हे ‘ बर्मगठिव्का ’ म्हंजे काय राव ?
नाना पाटेकरच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला , ‘ भायर्न आलाय दिस्तासा .’
मी : हो , लातूरहून

मग विक्रम गोखलेच्या स्टाईलमध्ये त्याने मला समजावलं . ‘ बर्मगठिव्का ’ म्हंजी , बर ऽऽ मंऽग ऽऽ ठिवू ऽऽ क्का . म्हंजी फून ( फोन ) ठिवू ऽऽ क्काऽ ’

( हात्तिच्या मा .. माझ्या तोंडात आलंच होतं . मात्र ओठाबाहेर फुटू दिलं नाही .)

‘ बर्मगठिव्का च्या ’ गुंत्यातून एकदाचा मोकळा झालो . डोकं हलकं हलकं झालं . इतका साधा सरळ शब्द मला कळला कसा नाही .

— WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेली गोष्ट 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..