संध्याकाळी फिरण्यास निघालो. बागेच्या दारापाशी एक ग्रंथ विक्रेत्याचे वाहन उभे होते. विशेष पुस्तकांची विक्री चालू होती. माझी नजर एका दुर्मिळ ग्रंथावर पडली. गेली कित्येक दिवस ते पुस्तक मी मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रकाशक, ग्रंथ भांडार, यांच्याकडून कळले होते कि त्याची नवीन आवृती येण्यास अवधी लागेल. मी ते विकत घेण्यासाठी पाकीट काढले. चार रुपये कमी पडत होते. हतबल झालो. पुस्तक विक्रेता नोकर माणूस होता. गाडी दूर गावची असून, लगेच जाणार होती. जवळपास कुणी परिचित दिसेना. सारे मार्ग खुंटले. मी निराश झालो. विवंचनेत पडलो. त्याच वेळी एक भिकारी, हात पुढे करून मला भिक मागू लागला. ते सहन झाले नाही. मी हात करून त्याला जाण्याची खून केली. तो नमस्कार करून जाऊ लागला. अचानक मला त्याच्या हातात काही नाणी दिसली. एक विचार मनात चमकला. मी त्याला बोलावले.
” फक्त सहा रुपये साहेब. माझे ह्यात पोट कसे भरणार? “ तो म्हणाला.
” चल मी तुला जेवण देतो. प्रथम माझे एक काम कर ” मी म्हणालो.
त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***३५
विज्ञान उकलते एक रहस्य, जाई आनंदून
जाणून त्यातील अनेक उपप्रश्ने जाते चक्रावून
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply