तुला जाणवल कसं
माज जगणं, सोसणं
वाट पाहून राह्यले
कधी सरल ह्ये जिणं
घाम गाळू तरी किती
किती जुंपू गं कामाला
दिस सरूनही जातो
थार नाही गं जीवाला
तुज्या अंगणी सडा गं
जाई जुई चमेलीचा
कशी गुंफू केसात गं
गुंता घामाच्या बटांचा
सण येती आणि जाती
बाया जिवाने नटती
बघू बघू तुटती गं
काया उनात रापती
कधी लेऊ नवा साज
मोडू साडीची घडी गं
उतरण लेऊन गं
विटे काळीज काळीज
कदी सरलं ह्ये भोग
कदी जगू नवं जग
सार कळूनही मना
वेडी आशा घेई रंग !
— वर्षा कदम.
Leave a Reply