नवीन लेखन...

भ्रष्टाचार-शिष्टाचार

(श्री. मुंदडा व श्री. दालमिया यांना दिलेल्या सवलती. ह्या गैरव्यवहार या संदर्भात मोडतात व त्याची म्हणजेच या गैरव्यवहाराची जबाबदारी थेट अर्थमंत्री श्री. टी. टी. कृष्णम्माचारी ह्यांचीच आहे. व ह्या मुद्यावर श्री. फिरोझ गांधी ह्यांनी प्रत्यक्ष आपल्या सासर्‍याचे म्हणजेच पं. जवाहरलाल नेहरु ह्यांची तमा न बाळगता त्यांचा अत्यंत आवडत्या अर्थमंत्री सहकार्‍याचा राजीनामा मागितला. व त्यांना तो द्यावा लागला.)

गेली तीन वर्षे भातीय राजकारण आर्थिक भ्रष्टाचार या राक्षसामुळे अक्षरशः ढवळून निघालेले आहे. इतिहासाचा मागोवा घेत असताना असे आढळून येते की देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेल्या पं. जवाहरलाल नेहरु १५ ते १६ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्षरुपाने एकही आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला नाही. आरोप झाला नाही.
मुंदडा व दालमिया ही दोन प्रकरणे गाजली पण ती प्रकणे दिलेल्या सवलतीच्या स्वरूपात होती. प्रत्यक्षात पैशाची देवाण घेवाण झालेली नव्हती. तरी सुध्दा पं. जवाहलाल नेहरु यांचे जावई फिरोझ गांधी ह्यांनी त्यावेळचे अर्थमंत्री श्री. कृष्णम्माचारी मेनन यांच्यावर लोकसभेत अअरोप केले. श्री. मुंदडा व श्री. दालमिया यांना दिलेल्या सवलती. ह्या गैरव्यवहार या संदर्भात मोडतात व त्याची म्हणजेच या गैरव्यवहाराची जबाबदारी थेट अर्थमंत्री श्री. टी. टी. कृष्णम्माचारी ह्यांचीच आहे. व ह्या मुद्यावर श्री. फिरोझ गांधी ह्यांनी प्रत्यक्ष आपल्या सासर्‍याचे म्हणजेच पं. जवाहरलाल नेहरु ह्यांची तमा न बाळगता त्यांचा अत्यंत आवडत्या अर्थमंत्री सहकार्‍याचा राजीनामा मागितला. व त्यांना तो द्यावा लागला. श्री. फिरोझ गांधी हे काँग्रेसचे खासदार होते. पंतप्रधानांचे जावई होते. प्रखर देशाभिमान व प्रखर राष्ट्रवाद निस्वार्थी जीवन याचा आदर्श असलेले फिरोझ गांधी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अजरामर ठरले. श्री. नेहरुंना काँग्रेस मधील खासदारांनी कधीच विरोध केलेला नव्हता त्याला अपवाद फक्त श्री. फिरोझ गांधींचाच मंत्रीमंडळातील एकमेव मंत्री श्री. चिंतामणराव देशमुख हे एकमेव काँग्रेस मंत्री ज्यांनी नेहरुंनी प्रत्यक्ष लोकसभेत संयुक्त महाराष्ट्रासाठी ठणकावले. व त्यांनी आपला राजीनामा दिला. श्री. फिरोझ गांधी पंतप्रधानांचे जावई होते त्यांनी कधीही आपल्या नात्यागोत्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा उठविला नाही.
काळ बदलला मुल्ये बदलली. अनैतिक व्यवहाराला राज्यमान्यता मिळाली. त्यामुळे श्री. रॉर्बट वडेरा हे ही सोनिया गांधींचे जावई. श्रीमती सोनिया गांधी देशाच्या राजकारणातील सत्तेचा रिमोट हातात असलेली सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेली व्यक्ति व श्री. रॉबर्ट वडेरा हे त्यांचे जावई. फिरोझ गांधींनी गैरव्यवहार बाहेर काढले तर रॉबर्ट वढेरांनी गैरव्यवहार केले. हे गैरव्यवहार नाहीत असे सरकार दरबारी खुले आम दिले गेले. म्हणजेच रॉबर्ट वढेरा ह्यांना क्लिनचिट मिळाली.
श्रीमती इंदिरा गांधींनी दीर्घकाळ पंतप्रधानपद सांभाळले त्यांच्या कारकीर्दीत एकही घोटाळा झाला नाही. श्री. राजीव गांधी यांच्या काळात ६४ कोटी रुपये बोर्फार्स कंपनीकडून घेतल्याचा आरोप झाला. बोफोर्स प्रकरण केवळ ६४ कोटी लाचेचे पण त्यात राजीव गांधींच्या सरकारचा बळी गेला.
श्री. नरसिंहराव ह्यांच्या काळात हर्षद मेहता ह्यांचा बँकांना फसविलेला मोठा आर्थिक घोटाळा पुढे आला. हर्षद मेहतांनी बकाँना ८ हजार कोटी रुपयांना फसविल्याचा आरोप झाला. त्यांना अटक झाली. बँकाँचे मोठे मोठे पदाधिकारी पकडले गेले तुरुंगात गेले. केसेस झाल्या पुढे हा बँक घोटाळा लोक विसरुन गेले. हर्षद मेहता तुरुंगात गेला. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा असाच कैक हजार कोटी रुपयांचा घोटाळा दाबला गेला. हर्षद मेहता तुरुंगात गेला, त्याने त्यावेळचे पंतप्रधान नरसिंहराव ह्यांना काही कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप झाला. नरसिंहराव यांचे जावई व पुत्र यांनी १०० कोटी रुपयांचा युरिया घोटाळा केला. ते सर्व लोक विसरले. झारखंड मंत्री मधू कोडा ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला त्यांना अटक झाली. हे सर्व घोटाळे हजारो कोटी किंवा शेकडो कोटी रुपयांचे होते. पण त्यात दसपटीने वाढ झाली. आणि आता गेल्या ५ वर्षांत आपण लाख लाख कोटी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत अस ऐकू लागलो. २ जी स्प्रेक्ट्रम घोटाळा, कोल घोटाळा, महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा, गॅस घोटाळा अवैध खणणाचा लोखंड घोटाळा हे सर्व घोटाळे किमान पन्नास हजार कोटी ते दोन लाख कोटी रुपयांचे आहेत. कर्नाटकात अवैधरितीने लोखंड काढण्यात आले काढण्यात भारतीय जनता पक्षाचे मंत्री रेड्डी बंधू व त्यांचे सहयोगी आमदार होते. हा लोखंड खणण व निर्यात घोटाळा किमान पन्नास हजार कोटी रुपयांचा आहे.३ वर्षापूर्वी प्रस्तुत लेखकाने अभ्यासपूर्वक हे मिडीयाद्वारे बाहेर आणले. पुढे खूप मोठे महाभारत काढले. सुप्रिम कोर्टाने दखल घेतली. सी. बी. आय. व सी. बी. सी. यांच्याद्वारे चौकशी झाली. रेड्डी बंधूंना अटक झाली. खाण व्यवसाय काही काळापुरता बंद झाला. अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून मुख्यमंत्री येडिरप्पा यांचे नांव समोर आले. त्यांनाही पायउतार व्हावे लागले.
काही कालावधीतच गोव्यातील खाण घोटाळे बाहेर आले. तेथूनसुध्दा कैक हजार कोटी रुपयांचा अवैध धंदा झाला. गोव्यातील खाणी बंद करण्याचा आदेश नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. पर्रिकर यांनी दिला गोव्यातील खाण घोटाळ्यामुळे खाणी बंद पडल्या. टाटांचा स्टील प्ल्न्ट व इतरही प्लॅन्ट बंद पडले तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रतापसिंह बराणे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. तेथेही कारवाई होईल. कर्नाटकातील घोटाळ्यात भाजप बदनाम झाले. गोव्यातील घोटाळ्यात काँग्रेस बदनाम झाले. एकूण काय काँग्रेस काय किंवा भाजपा काय? दोन्हीही एकाच माळेचे मणी.
भारत देश नैसर्गिक साधन सामुग्रीसाठी त्यातील विपुलतेसाठी प्रसिध्द आहे. प्रचंड, सुपीक, जमीन, मुबलक पाणी, लोखंड, बॉक्साईट, कोळसा, सोने यांच्या प्रचंड साठा असलेल्या खाणी त्यांतून निघू शकत असलेले प्रचंड उत्पन्न की जे उत्पन्न भारतातील एकही माणूस दारिद्य्र रेषेखाली राहणार नाही. एवढे संपन्न होऊ शकते त्या मूठभर राजकारणी त्यांच लागेबांधे असलेले उद्योजक, शासकीय येत्रणेत काम करणारे यच्चयावत कर्मचारी अधिकारी हे सर्व एकत्र यवून या संपन्न नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करीत आहेत. हतबल जनता डोळे उघडे ठेवून बघत आहे. विरोध कुठेच नाही. जनता गप्प, पंतप्रधान गप्प सर्वसामान्य माणूस मात्र भ्रष्टाचारांच्या परीणामांना महागाईने त्रस्त जीवन असह्य झालेले अशा परिस्थितीत देश एका महान संकटातून जात आहे. चाळीस टक्के जनता एक वेळ जेमतेम जेवण घेऊ शकतेय. काही दिवसांनी तेही मिळेल कि नाही ही शंका कारण धान्य, दाळी, दळण, दूध दुर्मिळ भाजीपाला विकत घेण्याची क्रयशक्ती संपणार आहे कारण या सर्व वस्तूंचे किंमत आकाशाला भिडलेली आहे. दूध व पेट्रोल एकाच भांवाने विकले जाणार आहे. देश श्रीमंत आहे. जनता गरीब होत चालली आहे. मूठभर राजकारणी मूठभर उद्योजक आणि शासनातील बडे बडे लोक आपली संपत्ती वाढवत आहेत ही संपत्ती देशाबाहेर जात आहे. उदा. मधु कोडाने झारखंडमध्ये मंत्री असतांना चार हजार कोटी कमावले व इंडोनेशियात कोळसा खाण विकत घेतली.
(त्यांतील लाभार्थी राजा कनिमोळी, बलवा, गोयंका व डझनभर सरकारी अधिकारी मुद्देमाल, पुराव्यानिशी सापडले आणि तुरुंगात गेले. वर्ष दोन वर्ष तुरुंगवास भोगून बाहेर आले. जनतेनी त्यांचा धिःक्कार करणे तर सोडा जग जिंकून आल्यानंतर जसे स्वागत होते तसे त्यांचे जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. श्री. कलमाडींचे तेच झाले; राष्ट्रकूल घोटाळा सहीसलामत बाहेर पडले.)
-२ जी स्प्रेक्ट्रम घोटाळा
एक लाख शहात्तर हजार कोटीचा कथित घोटाळा कॅगच्या अहवालामुळे बाहेर आला. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार त्यांतील त्यांचे सहकारी द्रविड मुन्नेत्र कळघम त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे राजा हे केंद्रात दूरसंचार मंत्री टेलीकॉम मंत्री यांनी जी व्यवहार केला त्याला कॅगने गैरव्यवहार म्हटले आणि देशाला दोन लाख कोटीचा फटका बसला असे निदर्शनास आणले. त्यांतील लाभार्थी राजा कनिमोळी, बलवा, गोयंका व डझनभर सरकारी अधिकारी मुद्देमाल, पुराव्यानिशी सापडले आणि तुरुंगात गेले. वर्ष दोन वर्ष तुरुंगवास भोगून बाहेर आले. जनतेनी त्यांचा धिःक्कार करणे तर सोडा जग जिंकून आल्यानंतर जसे स्वागत होते तसे त्यांचे जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. श्री. कलमाडींचे तेच झाले; राष्ट्रकूल घोटाळा सहीसलामत बाहेर पडले. शहीद बलवा हा छोटे तीन तारांकीत हॉटेलचा मालक अल्पावधीत हजारो कोटींचा मालक होतो पुण्याजवळील वादातील जमिन ताब्यात घेतो आणि महाकाय प्रचंड अशा कमर्शियल बिल्डिंगचे येरवडा परिसरात उभ्या करतो. पिंपरी चिंचवड परीसरातील अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी बांधले जाणारे प्रकल्पाची कंत्राट मिळवितो. १२०० घरांचे बांधकाम करतो. कुणाच्या आर्शिवादाने व कुणाच्या पैशातून कोणी अतुल नांवाचा प्राणी १० वर्षापूर्वी १० कोटी मालमत्तेला महाग आज पांच हजार कोटीचा प्रचंड कारोबार हाकतो आणि कोट्यावधी रुपयांचे देणग्या देतो आहे. किती जणांची नांवे सांगावित. पान गच्च भरेल. सेनापती बापट रोडवरील मोठे मोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स आज पुण्याच्या शोभेत भर घालीत आहेत. तेथील जमिनीचे मूळ मालक कोठे आहेत. त्यांना त्यांचा मोबदला मिळाला का? बस डे चे प्रवर्तक दैनिक त्यांचे कॉर्परेट ऑफिस कुणाच्या जागेवर उभे आहे त्याचे मूळ मालक कोण होते त्यांना पैसा मिळाला का? लोकमान्य टिळकांच्या समकालीन देशभक्त लोकहितवादी श्री. गोपाळराव देशमुख यांची कासारवाडी येथील पाच हजार एकर जागा राष्ट्रवादीच्या महाराष्ट्राच्या उच्च पदाधिकार्‍याने लाटलेली आहे. जेथे लोकहितवादीचे स्मारक व्हायला हवे तेथे मोठे मॉल उभे रहाणार. किती गोष्टी सांगू कोण करणार याचा भांडा फोड लोकहितवादींची ही जागा पुण्यात केजरीवाल अण्णा हजारे यांची माणसे असतील तर त्यांना हे आम्ही पुराव्यानिशी देऊ शकतो.
-कोळसा ब्लॉक आवंटन
महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांत कोळशाच्या प्रचंड खाणी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. तशा कोळशाच्या खाणी झारखंड व ओरीसा येथे पण आहेत. भाजपचे सरकार त्याच्या आधी म्हणजे जवळ जवळ ५० वर्षे या कोळशाच्या खाणींचा कारभार कोल इंडिया हि कंपनी चालवत होती. देशांतील सर्वांत संपन्न असा हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम खाणी नीट चालल्या होत्या. प्रचंड पैसा आपला जात होता. देशाच्या सार्वत्रिक विकासासाठी कोळसा वापरला जात होता पण त्यालाही दृष्ट लागली. सार्वजनिक क्षेत्रातील या कोळशाच्या खाणी खाजगी करण्याचा पहिला प्रयत्न भाजपा सरकारच्या काळांत झाला. रा. स्. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर येथील एका भाजपच्या वरीष्ठ नेत्यांने बनवारीलालने यांचे खाजगीकरणाचे सुतोवाच केले व पहिले खाजगी वितरण झाले. मूळ पाया रचला गेला आणि कालांतराने त्याचे रुपांतर कोयला ब्लॉक आबंटन ह्या नावाने प्रसिध्द झालेल्या दोन लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यात रुपांतर झाले. केंद्रात कोळसा मंत्री श्री. जयस्वाल ब्लॉक आबंटन मिळविणारा उद्योगपती श्री. मनोज जयस्वाल. वीस चाळीस वर्षापूर्वी या मनोज जैयस्वालचे किराणा मालाचे दुकान नागपूर येथील बर्डी विभागात होते. आज तो तीस ते चाळीस हजार कोटींचा व्याचसायिक उलाढाल करीत आहे. दर्डा कुटुंबिय व याचे भागीदार या कोळसा ब्लॉक आबंटन घोटाळ्यात जे कांहीघडलेले आहे. त्यामुळे देश जो प्रगतीचा मार्ग अत्यंत वेगाने आक्रमित होता तो तेवढ्याच गतीने अधोगतीला जाणार आहे. कारण कोट्यावधी कोटी रुपये मिळणारे उत्पन्न मूठभर उद्योजकांना प्रत्येकी लक्षावधी कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणार आहे. देश लुटला जाणार आहे. १०० कोटी लोकांना मिळणारा लाभ दहा वीस उद्योजकांच्या टोळक्यांना मिळणार, झालेला लाभ देशाच्या प्रगतीला न मिळता तो परदेशात जाणार जसे मधु कोडाने केले. केवढा हा दैवदुर्विलास. लोखंड काय, कोळसा काय, गॅस असो कि बॉक्साईट असो सगळ्यांची वाट लागलेली आहे. या सर्व दुष्परीणामाला जबाबदार देशांतील भ्रष्ट किड लागलेली राज्यव्यवस्था, शासन व्यवस्था यांत कोणी चांगले नाही सगळेच वाईट आहेत. काँग्रेस आहे भाजपा आहे, द्रविड मुन्येत्र कळघम आहे. जलसिंचन घोटाळा करणारे, तेलगीला पाठीशी घालणारे राष्ट्रवादी आहेत. ओरीसातींल पटनाईक आहेत, कोडा आहेत, मुडा आहेत, शिबू सोरेन आहेत भरडली जातोय आम आदमी, भुकेली, हताश, हतबल भारतीय जनता.
विश्वास लाकाळ, निगडी
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— विश्वास लाकाळ, निगडी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..