नवीन लेखन...

मग मदतीची अपेक्षा ईतरांकडुन कशासाठी…..?

सोमवार होता… साधारण दुपारी 1ची वेळ होती. देवळाच्या बाहेर कीमान 75 वर्षाची आजीबाई देवदर्शन करुन घाईगडबडीमध्ये बाहेर पडत होत्या. पण अचानक थांबल्या व हात धरायला काही शोधु लागल्या. मी क्षणार्धात ओळखले की प्रकृतीची गडबड असेल. मी व ईतर काहीजण त्यांना धरुन बाजुला घेऊन बसवलो. पण ईतरजण म्हणजे स्वताःला सुशिक्षित समजणारे आमच्याकडे हीन पध्दतीने पहात त्या आजीबाईकडे निरखुनपणे पाहुन स्वताःच्या चेहऱ्यावर अनेक रंगछटा व भावभावना प्रकट करत काहीही चौकशी न करता लवकरच निघण्याच्या तयारीत होते. काहीजण ओळखीचे चेहरेसुध्दा अनोळखीपणे लपवत त्याच गर्दीतुन वाट काढुन पळुनही जात होते… मी हे न्याहाळलो… व काही चेहरे लक्षात राहीलेच जे समाजसेवकाचा खोटा मुखवटा धारण केले होते. असो… अपेक्षेप्रमाणे ईतरांनी सहकार्य छानच करुन आजीबाईनां त्यांच्या परिवाराला बोलवुन सहीसलामत स्वाधीन केले.

साधारणपणे दोन महीने गेले… सोमवारच होता. देवळातुन बाहेर आल्यावर सिग्नलला एका चारचाकी गाडीच्या आजुबाजुला जोरजोरात हार्न वाजवणारे दिसले… एकटक पहात होतो… चालकाचा चेहरा ओळखीचा दिसला.. गाडीमध्ये काहीतरी बिघडल्यासारख वाटत होतच.. जवळुन पाहील तर एका वयोवृध्दाला छातीत त्रास जाणवत होता.. गाडीमध्ये सर्वंचजण अनअनुभवी तरुणतरुणी होते… सुशिक्षित व समाजसेवेचा मुखवटा धारण केलेली… मला क्षणार्धात त्या दिवशीचा क्षण आठवला. आजीबाईनां पाहुन ह्याच चालक मुखवटाधारकानेसुध्दा पळ काढला होता. त्यांनाही या आणीबाणीच्या क्षणी काय करावे हेच कळत नव्हते… काही लोक मदतीला जायच की नाही… याचाही विचार करत होतेच… पण शेवटी वाहतुक पोलिसाने प्रसंगानुरुप मदत करुन गाडी बाजुला घ्यायला सांगुन सर्वंच गर्दीला अक्षरशः हाकलून लावले.. पण ते सर्वंचजण हादरलेले होते… अशा प्रसंगाला सहसा यांनी जवळुन पाहीले नव्हतेच कारण अशांना ईतरांच्या आणीबाणीच्या प्रसंगात मदत करायला वेळ असतोच कुठे….? मग हा प्रसंग हाताळायचा कसा…? याचे ज्ञान येणार कोठुन…? जसा यांच्याकडे ईतरांना मदत करायला नसतो तशीच परिस्थिती ईतरांचीही आसु शकेलच की….? मग अशा वेळेस आपणही जर ईतरांकडुन मदतीसाठी अपेक्षा करतो… तर त्याचप्रमाणे ईतरांच्या अशा प्रसंगी आपणही मदत करायला नको…..? समाज हा आपल्यातुनच निर्माण होत असतो… फक्त मुखवटा धारण न करता योग्य त्या प्रसंगी योग्य ती माणुसकी दाखवता आली तरच… समाजातला प्रत्येकजणच खरा माणुस होऊ शकेल… अस मला वैयक्तिक वाटतय….

— विवेक जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..