मुला-मुलींची सहल ठरली । राणीच्या बागेत बसने गेली
रंगीबेरंगी पक्षांचा किलबिलाट । गाणी जणू गाताहेत भाट
हरणे, सांबरे धावू लागली । मुलांना खूपच मज्जा वाटली
शेंगा खात माकडे होती । नकटी नाके खाजवत होती
माकडा माकडा हूप । तुझ्या शेंडीला तूप
मुलांना वाटी गंमत खूप । तोच डरकाळी ऐकू आली
पट्टेवाले वाघ दिसले । मुलांनी दुरुनच त्यांना पाहिले
पिंजर्यात सिंहराज होते बसले । दाढी हलवून डोळे रोखले
गर्जना ऐकून सारे घाबरले । धावत-पळत पुढे गेले
झेब्र्यापेक्षा जिराफ लंबू । इथे तुम्ही पोरांनो नका थांबू
पाणमांजर, साळूंकी, कासव, ससे । गेंडा बघून आले हसे
दणकट गजराज समोर दिसला । सोंड उभारून सलाम केला
भूक लागली भूक लागली गलबला झाला
मुलांचा चमू गोलाकार बसला
डबे खाऊन फस्त झाले
पाणी पिऊन शांत झाले
फिरून फिरून सारे दमले
बसमध्ये जाऊन बसले
आई-बाबांची आठवण आली
घरी जायची घाई झाली
खुषीत मुले घरी आली
मज्जाच मज्जा सांगू लागली
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply