सध्या मराठा आंदोलन हिंडोळ्यासारखे हलत आहे, यात मुख्यमंत्री विरुद्ध मराठा राजकीय नेते (अजितराव सोडून), असे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. विषय वेगवेगळ्या तर्हेने रंगवून कलगी तुऱ्याचा फड रंग धरू लागला आहे.
ज्या राज्यातील 75 टक्के खासदार, आमदार, नगरसेवक, आणि सरपंच हे मराठा जातीचे आहेत असे चित्र आजचे नसून स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे आहे. अश्या प्रगत राज्यात हा समाज उपेक्षित, अशिक्षित, नोकरी व उद्योग धंद्यात पिछाडीवर राहिला असे मानले तर एक तर या शब्दांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, किंबहुना हे शब्द विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत असेच म्हणावे लागेल.
आज महाराष्ट्रात जितक्या शैक्षणिक संस्था आहेत, त्यातील जवळपास 65 टक्के संस्था या मराठा नेत्यांच्या आहेत, यात चांद्या पासून बांद्या पर्यंत विचार केला तर, प्रमुख नावे अशी आहेत, डी वाय पाटील, पतंगराव कदम, वसंतदादा पाटील, जयंतराव पाटील, विखे पाटील, दत्ता मेघे, विलासराव देशमुख, शरद पवार, विश्वनाथ कराड, या शिवाय छोटे नेते आहेतच. या सर्व संस्थांच्याकडे मेडिकल व इंजिनियरिंग कॉलेजेस ची भरमार आहे, आणि यातून हे शिक्षण महर्षी अब्जाधीश झाले.
या सर्व कॉलेजेसना भरमसाठ डोनेशन्स देऊन लाखो इंजिनीअर, व डॉक्टर तयार झाले. हि अफाट संपत्ती या लोकांच्याकडे आहे, त्यातील थोडी जरी उर्वरित वर सांगितलेल्या उपेक्षित समाजासाठी यांनी खर्च केली असती तर, आजची परिस्थिती उद्भवलीच नसती. याचा अर्थ यांनी समाजहित न पाहता, फक्त मतांचे राजकारण करून, स्वतःच्या तुंबड्या भरल्या. का नाही हे शिक्षण महर्षी, ज्यांची ऐपत नाही अश्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात घेऊन जात. इतकी वर्ष ओरबाडलेच ना? पुढची चार वर्षे नाही कमावले तर रस्त्यावर येऊन भीक मागायची वेळ नक्कीच नाही येणार या नेत्यांवर. मित्रानो मूक मोर्चा काय काढता, जाब विचारा.
आता वेळ आली आहे, याना अद्दल घडवायची, व खड्यासारखे दूर करून, यांच्या संपत्तीवर धावा बोलायाची. हा बेनामी पैसा हे लोक तुमची मते विकत घेण्यासाठी वापरतात. निवडणूका आल्या कि जवळपास एक महिना, तुम्हाला रेलचेल दारू पाजून, मटणाच्या पार्ट्या दिल्या जातात, यातच तुम्ही खुश होता. तुम्ही यांच्या मागे साहेब, दादा, भाऊ, म्हणत पळत रहाता, मग पुढची पाच वर्षे तुम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात, व हे लोक मलई खात रहातात. बदला राव तुम्ही आता, आत्मसन्मान जागा करा, घाला यांच्या घरावर हातोडे, विचारा त्यांना जाब.
आरक्षण हे ढोपरला लावण्याचे मधाचे बोट आहे. आजपर्यंत आरक्षणाने किती जातींचा उद्धार झाला, आकडेवारी काढा. जरी तुम्हाला आरक्षण मिळाले तरी, संपूर्ण राज्यात पंचवीस हजार पेक्ष्या जास्त नोकऱ्या मिळणार नाहीत, अहो जिथे लाखो बेरोजगार आहेत, तिथे हा आकडा म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे.
उद्योग धंदे सुरु करा, नवीन काही करण्याची मनीषा बाळगा, मेहनत करा, गुजराथी, मारवाडी, सिंधी, शीख लोकांच्या सारखे बना. आज आपल्या राज्यात सर्वात जास्त जमिनी, मोक्याच्या जागा या बाहेरून आलेल्या लोकांनी प्रचंड मेहनत करून मिळवल्या, त्यांचा आदर्श घ्या. या जमिनी एकेकाळी तुमच्या होत्या, त्या तुम्ही मातीमोल भावाने या नेत्यांच्या मागे लागून विकल्यात. तुमचा खूप वेळ भाऊबंदकीत जातो, उरलेला बामणांना शिव्या घालण्यात, तसेच स्थानिक राजकारण करून शेजाऱ्याच्या प्रगतीत खोडा कसा घालता येईल यात जातो, मग स्वतःची प्रगती करण्यास तुमच्याकडे वेळ कधी उरतो?
मोर्चे काढून कधीच कुणाचे भले झालेले ऐकण्यात व पहण्यात आलेले नाही, हे आळवावरच्या थेंबासारखे असते. काम धंदे सोडून या दलदलीत जाऊ नका. विनायक मेटे, सारख्या विचारवंतांच्या मागे जाल तर विनाश अटळ आहे. जाता जाता सांगतो, गांधी हत्येनंतर ब्राम्हणांची घरे जाळली, संपत्ती लुटली, कुळ कायदा लाऊन जमिनी गेल्या, म्हणून त्यांनी न आरक्षण मागितले, न मोर्चे काढले, लोकसंख्या दोन टक्के, त्यामुळे राजकारणापासून दूर राहिले, पण स्वतःची प्रगती नाही थांबवली.
मराठयांच्या सर्वात वरच्या दोन नेत्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे, त्याच्या अर्धी सुद्धा संपत्ती समस्त ब्राह्मण वर्गाकडे मिळून नाही, पण जी आहे ती समांतर विखुरलेली आहे, त्यामुळेच हे लोक माज येण्याइतके फार श्रीमंत नाहीत तसेच दारिद्र्यात पण बुडालेले नाहीत, आणि तशी वेळ आलीच तर देश सोडायची तयारी पण करतात.
।। मराठा तितुका मेळवावा ।। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
— विजय लिमये
(9326040204)
Leave a Reply