पूर्वी म्हणे गरीब लोक
कांदा – भाकर खावून दिवस काढायचे
आता त्यातील कांदा श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसलाय
आणि गरीब बिचारा नुसती भाकरी चघळत बसलाय …
पूर्वी म्हणे केळी गरीबाच फळ होत
मुंबईत श्रमजीवी गरीब केळी खावून दिवस काढायचे
आता ती केळीही श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसलेत
गरीब बिचारा आता त्याची चव फक्त उपवसालाच चाखतोय…
पूर्वी म्हणे वडापावाची पार्टी
एक गरीब दुसऱ्या गरीबाला द्यायचा
आता तो वडापावही श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसलाय
गरीब बिचारा आता त्यालाही पाहून जिभल्या चाटतोय…
आता म्हणे गरीबांना एक – दोन रुपये किलोने धान्य मिळणार
पण त्यांनी ते दळल्यावर श्रीमंतांचेच किसे भरणार
त्यातून बनलेले पंचपक्वान श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसणार
भिक नको पण कुत्रा आवर गरीब स्वतःशीच म्हणणार …
गरीब बिच्चारा शेवटी गरीबच राहणार हाय
श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार हाय
या सर्वात बळी मात्र नेहमीसारखाच
मध्यमवर्गीय माणसाचाच जाणार हाय…
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply