नवीन लेखन...

मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या उषाकिरण

उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी झाला.एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषा आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघी मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. वयाच्या बाराव्या वर्षी उषा मराठे यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. नंतर उषा किरण यांना ’सीता स्वयंवर’ हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती. पण ’मायाबाजार’ मध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली. मंगल पिक्चर्सचा ’जशास तसे’ आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित ’क्रांतीवीर वासुदेव बळवंत’ यांत केलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे उषाकिरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्यांनी अमेय चक्रवर्ती सारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकासोबतही काम केले. मात्र १९५० मध्ये ’श्रीकृष्ण दर्शन’ मध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषाकिरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. उषाकिरण यांनी ’जशास तसे’ मध्ये डोंबारीण आणि ’पुनवेची रात’मध्ये तमासगिरीण तर ’बाळा जो जो रे’मध्ये ’सोशिक स्त्री’ अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या. माधव शिंदेंच्या ’शिकलेली बायको’ आणि ’कन्यादान’मध्ये त्यांच्यातले अद्भुत अभिनय सामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली. ’पतिता’ मध्ये देव आनंद, ’दाग’ मध्ये दिलीपकुमार, ’काबुलीवाला’मध्ये बलराज साहनी तर ’नजराना’मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. डॉ. मनोहर खेर यांच्याशी त्यांचा १९५४ मध्ये त्यांचा विवाह झाला. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा मान त्यांना मिळाला. उषाकिरण यांचे यांचे ९ मार्च २००० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..