मराठी ग्रंथसंपदा 2008 : ग्रंथनिवड व ग्रंथ खरेदीचा सोपा मार्ग
मराठी ग्रंथव्यवहारांसंबधीत सर्व घटकांची माहिती संबधीत सर्वांना व्हावी. वर्षभरात नवी पुस्तके कोणती निघाली? त्यांची अद्ययावत व सर्वंकष सूची सर्व ग्रंथखरेदीकर्त्यांना सहज उपलब्ध व्हावी. प्रकाशक व ग्रंथविक्रेते यांचे संपर्कसूत्र सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावे. तसेच महाराष्ट्रात प्रकाशन व्यवहारात जो प्रादेशिक असमतोल आहे तो दूर व्हावा तसेच जे एखादे लेखक/प्रकाशक आहेत, त्यांचे सोशल मार्केटिंग व्हावे व यातून मराठी ग्रंथव्यवहार वाढावा व वाचकांना नवी पुस्तके तत्काळ मिळावी. याकरिता वापरा मराठी ग्रंथसंपदा 2008. पृ. 120 किं. 200 रू.मराठी ग्रंथव्यवहार वाढावा, अशी सर्वांची इच्छा आहे. परंतु याकरिता दरवर्षी मराठीत प्रसिद्ध सर्व पुस्तकांची समग्र सूची सर्व प्रकारच्या खरेदीदारांना उपलब्ध करून देण्याची गरज होती. ती गरज मराठी ग्रंथसंपदा 2008 हे पुस्तक मराठी ग्रंथ खरेदीदारांच्या हाती ठेवल्याने बरीच पूर्ण झाली आहे, असे वाटते.या संदर्भ वार्षिकात 807 पुस्तकांची सूची, 750 प्रकाशकांची पत्यांसह सूची आणि सुमारे 700 लहानमोठ्या ग्रंथविक्रेत्यांची संपर्क माहिती आहे. या 120 पानी पुस्तकांत प्रत्येक पान उपयुक्त माहिती भरलेले आहे. केवळ ग्रंथखरेदीला प्राधान्य देऊन तयार केलेले संदर्भ वार्षिक अशा स्वरूपाचे हे एकमेव प्रकाशन आहे, असे म्हणता येईल.
– सर्व ग्रंथविक्रेते व ग्रंथालये शाळा/महाविद्यालये यांनी या ग्रंथसूची च्या आधारे आपली ग्रंथनिवड व ग्रंथ खरेदी करावी. यासाठी त्यांनी मराठी ग्रंथसंपदा 2008 अवश्य विकत घ्यावे. या पुस्तकाचे दर्शनी मूल्य नाही तर त्याचे माहितीमूल्य व उपयोगिता लक्षात घ्यावी.- प्रत्येक मराठी ठोक ग्रंथ खरेदी कर्त्याने हे संदर्भ पुस्तक संग्रही ठेवावे म्हणजे कोणी काय प्रकाशित केले हे त्यास सहज समजेल व त्यानुसार काय खरेदी करायचे ते ठरविता येईल. मराठी ग्रंथसंपदा २००८ ची किंमत फक्त २००/- रु. आहे.
मराठी ग्रंथसंपदा २००९ मध्ये संपूर्ण पत्ता, फोन क्र. ई-मेल आदी. प्रसिद्ध होण्याच्या दृष्टीने शक्यतो आपले व्हिजिटिंग कार्ड पोस्टकार्डवर चिटकवून पाठवावे किंवा माहिती लिहून पाठवावी. तसेच नवीन प्रकाशित पुस्तकांची माहिती पाठवावी. दिवाळीपूर्वी प्रकाशकांनकडून प्रतिसाद न मिळाल्यास ही माहिती मराठी ग्रंथसंपदा 2009 मध्ये सामिल केली जाणार नाही, हा समावेश संपूर्णत: नि:शुल्क राहणार आहे. यानंतर मराठी ग्रंथसंपदा २००९ फेबु्रवारी २००९ मध्ये प्रसिद्ध होईल. यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २००८ या काळात प्रसिद्ध झालेल्या मराठी पुस्तकांची माहिती नि:शुल्क प्रसिद्ध केली जाईल. मराठी ग्रंथसंपदा २००९ म्हणजे नवीन मराठी पुस्तकांचा संयुक्त महाकॅटलॉग राहील.
संपर्क : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, पाने : १२० किंमत : २०० रु. भ्र. 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply