आज १८ ऑक्टोबर
आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीचा वाढदिवस.
जन्म:- १८ ऑक्टोबर १९७७
त्यांनी आपले शिक्षण जीजीभोय या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण सिडनाहम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले. वयाच्या नव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्या काल्पनिक कार्यक्रम उत्तर रामायण यात तरुण कुश भूमिका साकारली तिथून त्यांनी त्यांची अभिनय कारकीर्द सुरू केली. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. ‘टार्गेट’ नावाच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ नंतर मुक्ता बर्वे बरोबर एका लग्नाची दुसरी गोष्टनावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने ‘घन:श्याम’ उर्फ ‘घना’ची भूमिका बजावली. दरम्यान ‘मुक्ता बर्वे’ बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. ‘दुनियादारी’ चित्रपटात त्याने सुंदर भूमिका केलेली आहे व ‘जिंदगी, जिंदगी’ नावाचे गीत देखील गायले आहे. ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. हारे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply