नवीन लेखन...

मराठी नाटककार सतीश आळेकर

महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’सारख्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव! त्यांचा जन्म ३० जानेवारी १९४९ रोजी झाला.

आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते.

आळेकरांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. मा.आळेकरांचे शिक्षण पुण्यात झाले. त्याचे मामा काकासाहेब गाडगीळ.

शाळकरी वयात शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होतं. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.

फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख’, ‘काळोख’ या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.

‘मेमेरी’ ही पहिली एकांकिका आळेकरांनी ‘पीडीए’च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती ‘सत्यकथे’ला पाठली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध केली. ‘झुलता पूल’ एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.

‘घाशीराम कोतवाल ‘ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. थिएटर या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ‘मिकीमाऊस आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. मा.आळेकर यांनी ‘जैत रे जैत’ चित्रपटाची पटकथा, ‘देखो मगर प्यार से’ ही दूरदर्शन मालिका, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. मा. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.

सतीश आळेकर यांचा भारत सरकारने २०१२ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांना साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार,द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार, सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

नाटककार म्हणून त्यांची प्रतिमा असली तरीही त्यांनी नुकत्याच आलेल्या `व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटात अत्यंत संस्मरणीय भूमिका केली आहे.

संगीत नाटक अकादमीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अतुल पेठे यांनी ‘नाटककार सतीश आळेकर’ ही फिल्म निर्माण केली आहे.

सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके
अतिरेकी, एक दिवस मठाकडे, दुसरा सामना, बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, शनिवार-रविवार.
एकांकिका
आधारित, आळशी अत्तरवाल्याची गोष्ट, कर्मचारी, जज्‍ज, झुलता पूल, दार कोणी उघडत नाही, नशीबवान बाईचे दोन, बसस्टॉप, भिंत, भजन, मेमरी, यमूचे रहस्य, वळण, सामना, सुपारी.

सतीश आळेकर यांची वेबसाईट.http://satishalekar.com/

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..