मराठीत परभाषिक शब्दांचा धुमाकूळ !
भाषाशुद्धीचे आद्य प्रवर्तक आहेत छत्रपती शिवाजी महाराज ! त्यानंतर ही ध्वजा समर्थपणे पेलली ती स्वा. सावरकरांनी !! या दोघांच्याही चरणी ग्रंथारंभी प्रार्थना करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणातच अनेक मराठी जनांच्या तोंडी रुळलेल्या परकीय शब्दांची काही उदाहरणे देण्यात आली आहेत.
मराठी भाषिक प्रांतातील घर, कार्यालय, न्यायालय, राजमार्गातील विविध आस्थापनांच्या पाट्या आदी सर्व ठिकाणी परभाषेतील शब्दांच्या सुळसुळाटाचे या प्रकरणात वर्णन करण्यात आले आहे. स्वभाषेत शब्द उपलब्ध असतांना तो न योजता परभाषेतील शब्द आपण निर्धास्तपणे वापरतो, हे पाहून आपलीच आपल्याला लाज वाटेल. आजतागायत, तयार, शाहीर, मुलुख, शिवाय, कायदा, शहीद आदी शब्दांनी मराठीत नुसता धुमाकूळच घातलेला नाही, तर त्यांनी त्या अर्थाचे मराठीतील शब्दच आपल्याला विसरायला लावले आहेत !विरोधकांच्या आक्षेपांना उत्तरे
भाषाशुद्धीसाठी प्रयत्न करणार्यांना सर्वांत प्रथम स्वपक्षातील विरोधकांच्याच आक्षेपांना उत्तरे द्यावी लागतात. विरोधकांचे हे आक्षेप काहीवेगळे असतात असे नव्हे, तर ते स्वा. सावरकरांच्या वेळचेच असतात, उदा. परभाषिक शब्द न वापरणे हा त्या परभाषेचा द्वेष आहे, परभाषेतील शब्द वापरल्यामुळे मराठीची शब्दसंपत्ती वाढते, नवीन स्वदेशी शब्द रूढ होणे कठीण आहे इत्यादी. या आणि अशा सर्वच आक्षेपांवर स्वा. सावरकरांनी त्या वेळी दिलेली उत्तरे या ग्रंथात नमूद करण्यात आली आहेत. ही उत्तरे आजही तेवढीच समर्पक वाटतात.
या ग्रंथात स्वा. सावरकर आणि भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते माधवराव पटवर्धन यांच्या जीवनातील भाषाशुद्धीसंबंधीचे काही प्रसंग सांगितले आहेत. हे प्रसंग वाचून भाषाशुद्धीच्या कार्यावरील निष्ठा किती अविचल हवी, हे लक्षात येते. वाचकांना हे पाच-सहा प्रसंग अंतर्मुख तर करतीलच, तसेच त्यांचा स्वभाषाभिमानाचा पीळही बळकट करतील.स्वकीय शब्दांच्या रक्षणार्थ उपाय
भाषाशुद्धीचे काम अवघड वाटले तरी ते एक आवश्यक असे कर्तव्य समजून केले, तर
तसे कठीण नाही. परकीय शब्द टाळतांना जिभेला थोडा त्रास होईल, तरी `कात’ म्हणून ते स्वीकारल्यास एक-दोन वर्षांतच भाषाशुद्धी होऊन जाईल मराठी बोलतांना आणि लिहितांना इंग्रजी किंवा अन्य परकीय शब्द वापरण्याची सवय निंद्य आहे, हे समजून या सवयीचा दास झालेल्या प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करायला हवेत. मराठीत संभाषण करतांना इंग्रजी किंवा अन्य परकीय शब्द वापरणार्याने त्यावर प्रायश्चित्तही घ्यायला हवे. ही प्रायश्चित्ते कशी असावीत, हे ग्रंथात उल्लेखिलेल्या स्वा. सावरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी या संबंधात घेतलेल्या प्रायश्चित्तांवरून वाचकांच्या लक्षात येईल.साहित्यिकांनी आवर्जून गौरवावा, असा ग्रंथ !
संगणकीय पत्ता (इ-मेल) : satvikgranth@gmail.com
Leave a Reply