‘सराई’, ‘पाणकळा’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’ आदी कांदब-यांतून शेतक-यांची, आदिवासींची दु:ख ज्यांनी समाजाभिमुख आणली. स्वत:ला ज्यांनी ‘शेतकी कादंबरीकार’ मानले ते ज्येष्ठ कादंबरीकार श्री. र. वा. दिघे हे खोपोलीचे सुपुत्र. त्यांचा जन्म २४ एप्रिल १८९६ रोजी कल्याण येथे झाला. रघुनाथ वामन दिघे यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. हा नायक शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्ये जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी त्यानुसार झगडा देतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची त्या कादंबऱ्यांमध्ये उत्तम वर्णने वाचायला मिळतात. विशेषत: त्यांच्या पाणकळा आणि पड रे पाण्या या दोन कादंबऱ्यांतून भीमा नदीच्या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे जीवन समर्थपणे उभे केलेले दिसते. आजही खोपोलीला ‘दिघ्यांची खोपोली’म्हटलं की, अभिमानाने उर भरून येतो. खोपोलीतल्या, विहिरीकडे जाणा-या रस्त्याला र. वा. दिघे मार्ग नाव दिलं, तसेच खोपोली नगरपरिषदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी त्यांचे स्मारक उभे केले आहे. मा.रघुनाथ वामन दिघे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा कादंबरीकार र.वा.दिघे नावाचा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर ह्यांनी लिहिला आहे.रघुनाथ वामन दिघे यांचे ४ जुलै १९८० रोजी निधन झाले.
रघुनाथ वामन दिघे यांची साहित्यसंपदा
कादंबरी : पाणकळा, वसंतराव व चाळीसचोर, निसर्गकन्या : रानजाई, गानकुब्धा मृगनयना, आई आहे शेतात, पड रे पाण्या, कार्तिकी, सोनकी, हिरवा सण
कथासंग्रह : पूर्तता, पावसाचं पाखरू, पांडुरंग कांती , लक्ष्मीपूजन, आसरा
नाटक : माझा सबुद (मराठी)
द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड् (इंग्रजी)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply